दगड, झाडे, फांद्या टाकून अडविण्यात आलेले रस्ते खुले करा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 07:34 PM2020-03-28T19:34:54+5:302020-03-28T19:37:32+5:30
पावन मावळमधील गोडुंब्रे, साळुंब्रे, सांगवडे, आदी गावांतील ग्रामस्थांनी गावच्या प्रवेशद्वारावर बांबूंने अडकाठी करून रस्ता बंद केला आहे.तालुक्यात अशा प्रकारे रस्ते बंद करणा-या गावांना रस्ते खुले करण्याच्या सूचना संबंधित पोलीस अधिका-यांना दिल्या असल्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सांगितले.
शिरगाव : ग्रामस्थांनी रस्त्यावर दगड, झाडे, फांद्या टाकून अडविण्यात आलेल्या वेशी व रस्ते तत्काळ खुले करावेत, असे आवाहन तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केले आहे. कोरोना विषाणूंचे संक्रमण टाळण्यासाठी सर्व प्रयत्न चालू आहेत. मावळ तालुक्यातील अनेक गावांत रस्त्यावर दगड व झाडांच्या फांद्या टाकून रस्ते व वेशी बंद केले आहेत.
पुणो-मुंबईतील किंवा इतर गावातील नागरिकांनी गावात येऊ नये, व गावातील नागरिकांनी बाहेर जाऊ नये यासाठी रस्ते बंद करून गावांमध्ये येण्यास नो एन्ट्री केली आहे. गावात फेरीवाले तसेच विनाकारण फिरणारे नागरिक यांना मज्जाव केला आहे. तसेच गावातील काही तरु णांनी दक्षता समिती स्थापन करून गावात अनोळखी पाहुणा तसेच बाहेरगावी राहणारे नातेवाईक यांनी गावात प्रवेश करू नये याची खबरदारी घेण्यासाठी गस्त घालण्याची सुरु वात केली आहे. पावन मावळमधील गोडुंब्रे, साळुंब्रे, सांगवडे, आदी गावांतील ग्रामस्थांनी गावच्या प्रवेशद्वारावर बांबूंने अडकाठी करून रस्ता बंद केला आहे.
तालुक्यात अशा प्रकारे रस्ते बंद करणा-या गावांना रस्ते खुले करण्याच्या सूचना संबंधित पोलीस अधिका-यांना दिल्या असल्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सांगितले.