सर्वसमावेशक गटांना संधी
By admin | Published: March 24, 2017 04:06 AM2017-03-24T04:06:07+5:302017-03-24T04:06:07+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विषय समिती सदस्यांची निवड आज झाली. त्यात भाजपातील सर्वसमावेशक नगरसेवकांना
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विषय समिती सदस्यांची निवड आज झाली. त्यात भाजपातील सर्वसमावेशक नगरसेवकांना संधी दिली आहे. पिंपरी, चिंचवड किंवा भोसरी विधानसभा असा विचार न करता नगरसेवकांमधील गुणवत्तेला सदस्यनिवडीत प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.
पालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची सर्वसाधारण सभेत निवड झाली आहे. त्यामध्ये संख्याबळानुसार भाजपाच्या १०, राष्ट्रवादीचे ४, शिवसेना १ आणि अपक्षांचा १ नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत.
भाजपाचे सीमा सावळे, आशा शेंडगे, लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, उत्तम केंदळे, उषा मोंढे, माधुरी कुलकर्णी, हर्षल ढोरे, निर्मला कुटे, कोमल मेवानी यांची, तर राष्ट्रवादीकडून अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, शिवसेनेकडून अमित गावडे, अपक्षांकडून कैलास बारणे यांची वर्णी लागली आहे.
क्रीडा, कला, साहित्य, व सांस्कृतिक समिती सदस्यपदी अंबरनाथ कांबळे, भीमाबाई फुगे, बाळासाहेब ओव्हाळ, लक्ष्मण सस्ते, राजेंद्र गावडे (भाजपा), मंगला कदम, डब्बू आसवानी, राजू बनसोडे (राष्ट्रवादी), अॅड. सचिन भोसले (शिवसेना) यांची निवड झाली आहे.
विधी समिती सदस्यपदी शारदा सोनवणे, स्विनल म्हेत्रे, सुरेश भोईर, अश्विनी जाधव, शीतल शिंदे (भाजपा) सविता काटे, संतोष कोकणे, जावेद शेख (राष्ट्रवादी), मीनल यादव (शिवसेना) यांची निवड झाली आहे.
शहर सुधारणा समिती सदस्यपदी विकास डोळस, शैलेश मोरे, सागर गवळी, शशिकांत कदम, संतोष कांबळे (भाजपा), मयूर कलाटे, गीता मंचरकर, विनया तापकीर (राष्ट्रवादी), अश्विनी वाघमारे (शिवसेना) यांची निवड झाली आहे.
महिला व बालकल्याण समितीपदी योगिता नागरगोजे, सुनीता तापकीर, चंदा लोखंडे, सोनल गव्हाणे, सागर आंगोळकर (भाजपा),
सुलक्षणा शिलवंत, निकीता कदम, डॉ. वैशाली घोडेकर (राष्ट्रवादी), रेखा दर्शले (शिवसेना) यांची निवड
झाली आहे. (प्रतिनिधी)