पक्षवाढीसाठी प्रयत्न करणा-यांनाच संधी - संजय राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 01:58 AM2017-12-10T01:58:46+5:302017-12-10T01:59:02+5:30
पक्षवाढीसाठी जो प्रयत्न करेल, त्यालाच संधी दिली जाईल, असे शिवसेनेचे पश्चिम महाराष्टÑ संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कार्ला : पक्षवाढीसाठी जो प्रयत्न करेल, त्यालाच संधी दिली जाईल, असे शिवसेनेचे पश्चिम महाराष्टÑ संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
कार्ला येथे झालेल्या शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या बैठकीत खासदार राऊत बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संपूर्ण राज्यात सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी फिरत असून त्यांचाच आदर्श घेऊन मावळ तालुक्यातील पदाधिकारी, शिवसैनिक यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत. आपसातील मतभेद, मनभेद, बाजूला ठेवावेत.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत तालुक्यात जास्तीत जास्त निधी मी दिला असून, निधी देताना कुठलाच भेदभाव केला नाही. या पुढेही करणार नाही.
अन्य काही पदाधिका-यांनीही मनोगत व्यक्त केले. मावळ संपर्कप्रमुख वैभव थोरात, जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख महेश केदारी, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, माजी सभापती शरद हुलावळे, सल्लागार भारत ठाकूर, संघटक भूषण जगताप, लोणावळा नगर परिषदेतील विरोधी पक्षनेत्या शादान चौधरी, शिवसेनेचे सर्व नगरसेवक, युवा सेना अधिकारी अनिकेत घुले, मावळ युवा सेना चिटणीस विशाल हुलावळे, पंचायत समितीच्या माजी सदस्य आशा देशमुख, महिला संघटक शिला खत्री, लोणावळा शहरप्रमुख राहुल शेट्टी, तळेगाव शहरप्रमुख मुन्ना मोरे, लोणावळा युवा शहर अधिकारी तान्हाजी सूर्यवंशी, उपतालुका प्रमुख सुरेश गायकवाड, विभागप्रमुख अमित कुंभार, गबळू ठोंबरे, शंकर शिर्के आदी उपस्थित होते.
तालुक्यात शिवसेनेचा आमदार झाला पाहिजे
२०१९ चा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. म्हणून सर्वांनी तन, मन, धनाने कामाला सुरुवात करा. इतर पक्षांचा आमदार तालुक्यात होऊ शकतो तर शिवसेनाचा का नाही, ही खंत दूर करून तालुक्यात शिवसेनाचा आमदार झाला पाहिजे, असा संदेश उपस्थितांना खासदार राऊत यांनी दिला.