पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 09:03 PM2020-09-02T21:03:55+5:302020-09-02T21:04:43+5:30
पुढील विरोधी नेतेपदी कोण याची पिंपरी महापालिकेच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता
पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते व विरोधीपक्षनेते नाना काटे यांनी महापौर उषा ढोरे यांच्याकडे बुधवारी राजीनामा दिला आहे. त्यांचा विरोधीपक्षनेते पदाचा एक वर्षांचा कार्यकाळ मंगळवारी संपला. त्यामुळे यापुढील पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी कुणाची वर्णी लागते हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.
विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आपला कार्यकाल पूर्ण केला. महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध त्यांनी विरोधीपक्षनेता म्हणून जोरदार आवाज उठविला. मात्र,वर्षभराचा कार्यकाल पूर्ण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पिंपरी महानगरपालिकेच्या विरोधीपक्षनेतेपदी कुणाची वर्णी लागणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. या पदासाठी पक्षाकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. पक्षाच्या नऊ नगरसेवकांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी शहराध्यक्षांकडे अर्ज दाखल केले आहे. २०२० च्या महापालिका निवडणुकांच्या मोर्चेबांधणीच्या दृष्टीने राष्ट्रवादीकडून कुणाच्या खांद्यावर विरोधीनेतेपदाची जबाबदारी दिली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.