पवना जलवाहिनीला विरोधच; शेतकऱ्यांनी केला पालक मंत्र्यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 04:53 AM2018-07-30T04:53:38+5:302018-07-30T04:53:51+5:30

पिंपरी येथील एका कार्यक्रमात पालक मंत्री गिरीश बापट यांनी पवना बंद जलवाहिनी हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे सांगितले होते. या दुटप्पी भूमिकेचा निषेध व्यक्त केला आहे. बंद जलवाहिनी रद्द करा अशी मागणी शेतक-यांनी केली.

 Opposition to Pawana water channel; Farmers protest by Guardian ministers | पवना जलवाहिनीला विरोधच; शेतकऱ्यांनी केला पालक मंत्र्यांचा निषेध

पवना जलवाहिनीला विरोधच; शेतकऱ्यांनी केला पालक मंत्र्यांचा निषेध

Next

पवनानगर : पिंपरी येथील एका कार्यक्रमात पालक मंत्री गिरीश बापट यांनी पवना बंद जलवाहिनी हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे सांगितले होते. या दुटप्पी भूमिकेचा निषेध व्यक्त केला आहे. बंद जलवाहिनी रद्द करा अशी मागणी शेतकºयांनी केली. पवना बंद जलवाहिनीला विरोध करण्यासाठी समितीची बैठक झाली. त्या वेळी पालकमंत्र्यांचा निषेध केला.
पालक मंत्र्यांच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करण्यात आला. काही झाले तरी बेहत्तर, पण ज्या आंदोलक शेतकºयांवर गुन्हे दाखल झाले आहे ते लवकरात लवकर मागे घ्या, असे ठराव एकमताने मंजूर केले. या वेळी तळेगाव नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी, पांडुरंग ठाकर, गुलाब वरघडे, भारत ठाकूर, गणेश धनिवले,अमित कुंभार, अनिल तुपे, संदीप भुतडा, नितीन बुटाला, गणेश ठाकर,किसन खैरे,शिवाजी सुतार, सुदाम घारे,अजित चौधरी आदी उपस्थित होते.

पवना धरणाच्या पाण्याला येथील स्थानिक बळीराजा कदापीही हात लावू देणार नाही. पिंपरी- चिंचवड पालिकेला गहुंजेवरून पाणी घेऊन जावे, यापेक्षा दुसरा कोणताही पर्याय नाही. १९७२ पासून पाणी देतोय तर पाणी प्या, परंतु पवित्र पवना माईला जर कोणी गटारगंगा करायचा घाट घातला तर त्याला पण आम्ही सोडणार नाही.
- ज्ञानेश्वर दळवी, अध्यक्ष, पवना बंद जलवाहिनी समिती

ज्या वेळी भाजपा नेते बोलत होते, की जर आमचे सरकार जर गल्लीपासून दिल्लीपर्यंत आले, तर पवना बंद जलवाहिनी प्रकल्प हद्दपार करू व शेतकºयांवरील गुन्हे मागे घेऊ आणि आता जर आपण शेतकºयांना गाजर दाखवत असाल, तर हे माणसाच्या दृष्टीने योग्य नाही. खरेच त्यांना पाण्याची गरज असेल, तर त्यांनी राजकारण न करता गहुंजेवर पाणी उचलून न्यावे. - भारत ठाकुर, शिवसेना उपतालुका प्रमुख

Web Title:  Opposition to Pawana water channel; Farmers protest by Guardian ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.