तुकाराम मुंढेच्या बदलीला विरोध

By admin | Published: July 2, 2017 02:55 AM2017-07-02T02:55:19+5:302017-07-02T02:55:19+5:30

पुणे महानगरपालिकेचे परिवहन मंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची बदली करण्यासाठी काही लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची

Opposition to the return of Tukaram Mundhe | तुकाराम मुंढेच्या बदलीला विरोध

तुकाराम मुंढेच्या बदलीला विरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कात्रज : पुणे महानगरपालिकेचे परिवहन मंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची बदली करण्यासाठी काही लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची चर्चा सध्या पालिकेसह पुणे शहरात जोरात सुरू आहे. मात्र एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला राजकीय लोक पाठिंबा देत नसले तरी सामाजिक संस्थांचा मात्र मुंढे यांना पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे. मुंढे यांच्या समर्थनार्थ कात्रज चौकात शिवशंभू प्रतिष्ठान ही सामाजिक संघटना रस्त्यावर उतरली आहे. त्यांची बदली करू नये, या मागणीसाठी या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कात्रज चौकात निदर्शने केली.
‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व सुरळीत करण्यासाठी आम्हाला तुकाराम मुंढे पुण्यात हवे आहेत : मी एक पुणेकर’ अशा आशयाचे मजकूर असलेले फलक शिवशंभू प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी या वेळी हातात घेतले होते.
कात्रज येथील पीएमपी स्थानकासमोर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम यांच्या नेतृत्वाखाली किरण खामकर, राजू कदम, अक्षय दीक्षित, ज्ञानेश्वर गांगुर्डे, अतिश नाईकनवरे, अक्षय जाधव, महादेव येरवग्गे, अजय चिंचाणे, अमर कडू, राज भोसले, रोहन भिंताडे, स्वप्निल मकाशे, बंटी भोसले, शुभम भोईटे, सागर घाडगे यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.
पीएमपी सध्या आर्थिक डबघाईस आली आहे. ती नफ्यात आणण्यासाठी दिवसरात्र प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे आहेत. त्यासाठी अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची आवश्यकता आहे. राजकीय जोडे बाजूला सारून आज सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, असे मत या वेळी कदम यांनी व्यक्त केले.

Web Title: Opposition to the return of Tukaram Mundhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.