पाणीपट्टीवाढीस लघुउद्योगकांचा विरोध

By Admin | Published: April 1, 2017 01:41 AM2017-04-01T01:41:34+5:302017-04-01T01:41:34+5:30

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पाणीपट्टी वाढवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे

Opposition of small industrialists in the watercourse | पाणीपट्टीवाढीस लघुउद्योगकांचा विरोध

पाणीपट्टीवाढीस लघुउद्योगकांचा विरोध

googlenewsNext

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पाणीपट्टी वाढवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यास पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेने विरोध करत तीन तास पाणीपुरवठा करण्याची तसेच पाणी दरात कपात करण्याची मागणी केली आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील सेक्टर नंबर ७ ,१०, कुदळवाडी, तळवडे, शांतीनगर या परिसरात महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून ३० रुपये प्रतिहजार दराने उद्योगांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु, हा पाणी पुरवठा फक्त एक वेळ आणि तो देखील अत्यंत कमी दाबाने व कमी वेळ केला जातो. त्यामुळे बऱ्याच वेळा उद्योजकाना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील कामगारांना पिण्यासाठी व इतर कामासाठी केला जातो. या पाण्याचा कोणताही व्यावसायिक वापर केला जात नाही. तरीही पिंपरी-चिंचवड पालिकेकडून व्यावसायिक दराने पाणीपट्टी अकारली जाते, असे संघटनेचे म्हणणे आहे.
प्रस्तावित पाणी पट्टीवाढ रद्द करुन सध्या आकारला जाणारा दरसुद्धा कमी करावा व उद्योगांना दिवसातून किमान दोन वेळा पूर्ण दाबाने तीन तास तरी पाणी पुरवठा करण्यात यावा. लघुउद्योजक मंदीमुळे अडचणीत आहेत. त्यातच पालिकेने पाणीपट्टीत वाढ केल्यास लघुउद्योजकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

या बाबत बोलताना पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रस्तावित पाणी पट्टीवाढीचा निर्णय हा उद्योजकावर अन्यायकारक आहे. पलिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहिन्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी गळती होऊन पाणी वाया जाते. पाणी मीटर सदोष असल्यामुळे उद्योजकांना चुकीची बिल दिले जाते. उद्योगांना दिवसातून किमान २ वेळा पूर्ण दाबाने तीन तास तरी पाणी पुरवठा करावा, यासाठी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना गेली ७ ते ८ वर्षांपासून पालिकेकडे पाठपुरवा करत असून पालिकेकडून फक्त आश्वासन दिले जाते.

Web Title: Opposition of small industrialists in the watercourse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.