शास्तीचा आदेश का पोहोचत नाही
By admin | Published: February 14, 2017 02:09 AM2017-02-14T02:09:14+5:302017-02-14T02:09:14+5:30
देवदेवतांच्या छायाचित्रे काढण्याचा आदेश राज्यात पोहोचतो मात्र अनधिकृत बांधकामाची शास्ती रद्द झाल्याचा आदेश का पोहोचत नाही
पिंपरी : देवदेवतांच्या छायाचित्रे काढण्याचा आदेश राज्यात पोहोचतो मात्र अनधिकृत बांधकामाची शास्ती रद्द झाल्याचा आदेश का पोहोचत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांंनी केला.
आकुर्डी येथील शिवसेनेच्या प्रचार सभेस जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार नीलम गोऱ्हे, गौतम चाबुकस्वार, संपर्कप्रमुख अमोल कोल्हे, शहराध्यक्ष राहुल कलाटे आदी उपस्थित होते.
नोटाबंदीनंतर महिलांच्या बचतीकडे लक्ष देणार? असे भाजपाले म्हणाले. महिलांनी डब्यात काही बचत केली. हा काय चोरीचा, काळा पैसा आहे. कोणी जर डबे तपासायला आले तर डबे उघडून त्यात त्यांचे डोके बुडवा. रॅड सारखा अत्याचार सुरू आहे. याला स्वातंत्र्य म्हणायचे, असा सवाल ठाकरे यांनी केला. ठाकरे म्हणाले, ‘‘शिवसेनेत गुंड आहेत, असा आरोप भाजपा करते. माझ्या पक्षात गुंडापुडांना स्थान नाही. भाजपानेच इतर पक्षांतील गुंडांना स्थान दिले आहे. तमाम गुंड भाजपात जात आहेत, हे वास्तव आहे. आणि त्यांचे मंत्री वाल्ह्याचा वाल्मीकी असे समर्थन करीत आहेत. मध्यप्रदेशात भाजपाचा एक सदस्य पाकिस्तानचा हेर असल्याचे निष्पन्न झाले. मग पाहा कोण गुंडांना पोसतेय? असा सवाल उद्धव ठाकरे यांच्यासह स्थानिक नेत्यांनी केला.
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, ‘‘सभेस येत असताना पुण्यात गाजराचा पाऊस पडला. त्यामुळे येण्यास थोडा उशीर झाला. आज मुख्यमंत्री पुण्यात असल्याने शहर गाजरमय झालेय.’’
‘‘राष्ट्रवादी काँगे्रस आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाजपाची सूज ओसरल्यानंतर तिकडे गेलेले पुन्हा राष्ट्रवादीत येतील,’’ अशी टीका श्रीरंग बारणे यांनी केली.
कोल्हे म्हणाले, ‘‘सत्ताधारी राष्ट्रवादीने रुग्णालयापासून ते स्मशानभूमीपर्यंत अशा प्रत्येक टप्प्यावर भ्रष्टाचार केला आहे. सध्या आरएसएसच्या कार्यकर्त्यांना दु:ख
होत असेल.’’ (प्रतिनिधी)