नामांकित शैक्षणिक संस्था एकाच छताखाली, ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१८’चे आॅटो क्लस्टरला आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 03:24 AM2018-05-28T03:24:41+5:302018-05-28T03:24:41+5:30
-‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१८’ या प्रदर्शनाला २ जूनपासून चिंचवड येथील आॅटो क्लस्टर येथे सुरुवात होत आहे़ युनिक अॅकॅडमी ट्रस्ट आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ यांच्या मदतीने हे प्रदर्शन होत आहे.
पिंपरी -‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१८’ या प्रदर्शनाला २ जूनपासून चिंचवड येथील आॅटो क्लस्टर येथे सुरुवात होत आहे़ युनिक अॅकॅडमी ट्रस्ट आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ यांच्या मदतीने हे प्रदर्शन होत आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून शहरातील विविध नामांकित शैक्षणिक संस्थांची दालने एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थी व पालकांसाठी ही चांगली संधी आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात वास्तव्यास येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शहरात विविध शैक्षणिक संस्थांमध्ये संधी उपलब्ध आहेत. मात्र, त्याबाबत पुरेशी माहिती नसल्याने पालकांचा गोंधळ उडतो. दरम्यान, या प्रदर्शनामुळे एकाच ठिकाणी पालकांना शिक्षण क्षेत्रातील विविध संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमाचे आऊटडोअर पार्टनर धिरेंद्र अॅडव्हर्टायझिंग हे असून ब्रेव्हरेज पार्टनर टीव्हीयुएम कन्स्ट्रक्शन हे आहेत.
राज्यातूनच नाही तर देशाच्या कानाकोपºयातून शहरात विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. उद्योग, व्यवसायानिमित्त पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात येणाºया कामगारांच्या मुलांनाही शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत आहे. डी. वाय. पाटील गु्रपने नेहमीच विद्यार्थ्यांचे हित जपले आहे. एक लाखाहून अधिक विद्यार्थी पास होऊन विविध मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या या अॅस्पायर एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून एकाच ठिकाणी शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.
- डॉ. के. टी. जाधव, अॅडमिशन इनचार्ज-डी. वाय. पाटील, आकुर्डी
‘लोकमत’ने आयोजित केलेल्या एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअरविषयीची माहिती एकाच छताखाली सहज उपलब्ध होते. उच्च शिक्षण देणाºया संस्था यामध्ये सहभागी होतात. या संस्थांचे प्रतिनिधी थेट विद्यार्थी, पालकांशी संवाद साधतात. विविध शैक्षणिक संस्थांची दालने एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने शिक्षणाच्या संधी आणि करिअरचे विविध पर्याय निवडणे विद्यार्थ्यांना सुलभ होते. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा व श्रम वाचतो.
- दीपक शहा, अध्यक्ष-प्रतिभा कॉलेज, चिंचवड
सध्याच्या डिजिटल युगात तळहाताइतक्या मोबाइलवर विविध क्षेत्रांची माहिती मिळते. मात्र, त्या माहितीची पडताळणी करणेही तितकेच आवश्यक आहे. यासाठी ‘लोकमत’ने आयोजित केलेले प्रदर्शन उपयुक्त ठरेल. नामांकित शैक्षणिक संस्थांच्या सहभागासह तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. यामुुळे विद्यार्थ्यांना आपले करिअर निवडण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी व पालकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी.
- संतोष रासकर, कार्यकारी संचालक-सृजन क्लासेस, पुणे
शिक्षण आणि करिअरबाबत मुलांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. ही संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून ‘लोकमत’ने उपलब्ध करून दिली आहे. शहरातील विविध चांगल्या संस्थांबाबतची माहिती येथे एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. येथे तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळणार आहे. विद्यार्थी व पालकांसाठी ही चांगली संधी आहे. तरी नागरिकांनी या प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी.
- धनंजय वर्णेकर, संस्थापक अध्यक्ष,
आयआयबीएम कॉलेज, चिखली.