...अन्यथा महापौर कार्यालयात विरोधी पक्ष
By admin | Published: March 22, 2017 03:18 AM2017-03-22T03:18:12+5:302017-03-22T03:18:12+5:30
सध्याचे विरोधी पक्षनेत्याचे कार्यालय अपुरे पडत असून प्रशस्त कार्यालय उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते
पिंपरी : सध्याचे विरोधी पक्षनेत्याचे कार्यालय अपुरे पडत असून प्रशस्त कार्यालय उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केली आहे. दोन दिवसांत कार्यालय उपलब्ध न झाल्यास महापौर कार्यालयात ठाण मांडू, असा इशाराही बहल यांनी दिला आहे.
याबाबत आयुक्तांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँगे्रसचे एकूण ३६ नगरसेवक आहेत. नगरसेवकांची आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता सध्याचे कार्यालय अपुरे पडणार आहे. नगरसेवक, स्वीकृत सदस्य, कार्यालयीन कर्मचारी अशी एकूण ४५ ते ५० इतकी संख्या होते. या सर्वांना बसण्यासाठी व कामकाजासाठी कार्यालयाची आवश्यकता आहे.
याबाबत शहर अभियंता, तसेच कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी केली आहे. महापौरांशीही चर्चा करुन कार्यालयाची मागणी केलेली आहे. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तरी याप्रकरणी लक्ष घालून कार्यालय उपलब्ध करून द्यावे. (प्रतिनिधी)