वाकड मधील महिलेला सव्वा लाखांचा आॅनलाईन गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 08:35 PM2018-09-11T20:35:27+5:302018-09-11T20:37:11+5:30
महिलेच्या बँक खात्याची माहिती चोरून त्याद्वारे १ लाख २२ हजार चारशे रुपये खात्यातून आॅनलाईन पद्धतीने वळते करत गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.
पिंपरी-चिंचवड : महिलेच्या बँक खात्याची माहिती चोरून त्याद्वारे १ लाख २२ हजार चारशे रुपये खात्यातून आॅनलाईन पद्धतीने वळते करत गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अर्चना इंदरलाल जैस्वाल (वय ४१, रा. धनराज पार्क वाकड ) यांनी वाकड ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत उपनिरीक्षक रमेश केंगार यांनी दिलेली माहिती अशी फिर्यादी महिला या मूळच्या दिल्लीच्या असून त्यांच्या नवी दिल्लीतील बाराखंबा रोड शाखेत आयडीएफसी आणि अॅक्सिस बँकेत खाती आहेत.या दोनही बँक खात्यांचा क्रमांक व इतर इत्यंभूत माहिती अज्ञात इसमाने मिळवून झाक ई-पेमेंट, सर्व्हिसेस पेमेंट गेट वे द्वारे ओनलाईन पद्धतीने दोन दिवसात टप्पाटप्याने १ लाख २२ हजार चारशे रुपये काढून घेतले.