पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात ऑक्सिजन गळती!, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली; जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 08:27 PM2021-06-09T20:27:48+5:302021-06-09T20:38:39+5:30

नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन गळतीची भयंकर घटना राज्यानं भोगलेली असताना अशाच प्रकारची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे.

Oxygen leak at Pimpri Chinchwad ycm hospital | पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात ऑक्सिजन गळती!, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली; जीवितहानी नाही

पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात ऑक्सिजन गळती!, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली; जीवितहानी नाही

Next

नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन गळतीची भयंकर घटना राज्यानं भोगलेली असताना अशाच प्रकारची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. पिपंरी-चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटमध्ये गळती झाली. पण कर्मचाऱ्यांच्या सजगतेनं आणि अग्निशमन दलाच्या दक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सुदैवानं या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. रुग्णालय प्रशासन आणि अग्निशमन दलानं तातडीनं गळतीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. 

नाशिकच्या झाकिर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानं २२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. हॉस्पिटलमध्ये १५० रुग्ण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर होते. ऑक्सिजन टाकीमधून गळती झाल्याने अर्धा तास इथला ऑक्सिजन पुरवठा बंद झाला होता. त्यामुळे २२ रुग्णांना प्राण गमावावे लागले होते. 

Web Title: Oxygen leak at Pimpri Chinchwad ycm hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.