जमीन खरेदीसाठी विकणाऱ्यांना ४ लाख दिले; त्यांनीच जागेवर ताबा मारल्याचे आढळून आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 03:20 PM2021-07-08T15:20:02+5:302021-07-08T15:49:14+5:30

बेकायदेशीरपणे जमिनीवर ताबा मारल्याप्रकरणी तीघांवर गुन्हा दाखल

Paid Rs 4 lakh for land purchase; It was found that the place was occupied by the sellers | जमीन खरेदीसाठी विकणाऱ्यांना ४ लाख दिले; त्यांनीच जागेवर ताबा मारल्याचे आढळून आले

जमीन खरेदीसाठी विकणाऱ्यांना ४ लाख दिले; त्यांनीच जागेवर ताबा मारल्याचे आढळून आले

Next

पिंपरी: जमीन खरेदीसाठी चार लाख देऊन तिचे साठेखत आणि कुलमुखत्यारपत्र तयार केल्यानंतर देखील जमिनीवर ताबा मारला. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ११ एप्रिल २०१६ ते सात जुलै २०२१ या कालावधीत काळेवाडी मधील तांबे शाळेमागे घडला. या प्रकरणी रामकृष्ण महादेव पदमने (वय ३३, रा. पडवळनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विठ्ठल कोंडीबा जाधव (रा. तापकीरनगर, काळेवाडी), ज्ञानेश्वर गणपत नखाते (रा. नखातेनगर, रहाटणी), दत्तात्रय भाऊसाहेब कदम (रा. तांबे शाळेमागे, काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अद्याप आरोपींना अटक झालेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पदमने यांनी काळेवाडी येथे जमीन खरेदी केली आहे. त्यासाठी त्यांनी आरोपींना चार लाख रुपये दिले. त्यानंतर जमीन ताबा, साठेखत आणि कुलमुखत्यारपत्र त्यांच्या नावे करण्यात आली. एप्रिल २०१७ ते जुलै २०१७ या कालावधीत संतोष बधाले यांना पदमने यांनी खरेदी केलेल्या जागेवर ताबा मारल्याचे आढळले. याबाबत त्यांनी तातडीने आरोपी विठ्ठल जाधव यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांनी पदमने यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत गुन्हा नोंदवला.

Web Title: Paid Rs 4 lakh for land purchase; It was found that the place was occupied by the sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.