उद्या पंढरपूरचा विठ्ठलही गुजरातला नेतील, पुण्याच्या मैदानात धनंजय मुंडेंची तुफान बॅटींग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 01:46 PM2023-02-21T13:46:24+5:302023-02-21T13:53:30+5:30

धनंजय मुंडेंनी सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकारणाचा उल्लेख करत हे सरकार अशोक सराफच्या अशी ही बनवाबनवी चित्रपटाप्रमाणे सत्तेत आल आहे.

Pandharpur's Vitthal will also take Gujarat tomorrow, Dhananjay Munde's batting storm in Pune ground of politics kasba peth | उद्या पंढरपूरचा विठ्ठलही गुजरातला नेतील, पुण्याच्या मैदानात धनंजय मुंडेंची तुफान बॅटींग

उद्या पंढरपूरचा विठ्ठलही गुजरातला नेतील, पुण्याच्या मैदानात धनंजय मुंडेंची तुफान बॅटींग

googlenewsNext

पुणे - कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दोन्हीकडे भाजप आणि महविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. दोन्ही पक्षाचे नेते बैठका घेण्याबरोबरच प्रचारातही सहभागी होत आहेत. राज्याचे मुखमंत्री, उपमुख्यमंत्री यांनीसुद्धा निवडणुकीच्या अनुषंगाने कसबा - चिंचवड मतदार संघात भेटी दिल्या आहेत. तसेच त्या भागातील नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या आहेत. तर, महाविकास आघाडीचेही स्टार प्रचारक मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही पिंपरी चिंचवडमध्ये येऊन तुफान बॅटींग करत सरकारला लक्ष्य केलं. 

धनंजय मुंडेंनी सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकारणाचा उल्लेख करत हे सरकार अशोक सराफच्या अशी ही बनवाबनवी चित्रपटाप्रमाणे सत्तेत आल आहे. त्यानंतर, पळवापळवी करुन सरकारचा कारभार सुरू असल्याचंही धनंजय मुंडेंनी म्हटले. पुण्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र आणि १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरचा उल्लेख आसामच्या पर्यटन यादीत केल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारवरही त्यांनी निशाणा साधला. 

आजपर्यंत यांनी उद्योग पळवले, आमदार पळवले, आता देवही पळवायला लागले आहेत. शिवपुराणात भीमाशंकरचा उल्लेख आढळतो, ते भीमाशंकर आपल्या पुणे जिल्ह्यात आहे. मात्र, ते भीमाशंकर यांनी आसामला नेलं, आमच्या हिंगोली जिल्ह्यातलं औंढ नागनाथाच मंदिरही पळवलं. शिवपुराण कोणीही बदलू शकत नाही, भाजपच्या कुठल्याही धर्मवेड्या माणसाने माझ्याशी चर्चा करावी, शिवपुराण बदलता येत नाही. आमच्या परळीचं ज्योतिर्लिंग झारखंडला पळवलं. या अधिवेशनात जयंत पाटील पुन्हा महाराष्ट्रातील देव पळवल्याचा प्रश्न विचारतील, तेव्हाही मुख्यमंत्री उत्तर देतील. 

महाराष्ट्राच्या पंढरपूरचा विठ्ठलही उद्या हे गुजरातला नेतील, यावर विधानसभेत प्रश्न विचारल्यावर ते पुन्हा उत्तर देतील. विठ्ठल गेलाय ठिकंय, आम्ही तिरुपती आणून देऊ असं उत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देतील, असे धनंजय मुंडेंनी म्हटले. यावेळी, उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

Web Title: Pandharpur's Vitthal will also take Gujarat tomorrow, Dhananjay Munde's batting storm in Pune ground of politics kasba peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.