Pimpri Chinchwad: वाहनांची तोडफोड, लूटमार करत पसरविली दहशत; एकाला अटक, २ अल्पवयीन साथीदार ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 01:49 PM2023-07-03T13:49:52+5:302023-07-03T13:50:40+5:30

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाची कारवाई...

Panic spread by vandalizing vehicles, looting; One arrested, 2 minor accomplices in custody | Pimpri Chinchwad: वाहनांची तोडफोड, लूटमार करत पसरविली दहशत; एकाला अटक, २ अल्पवयीन साथीदार ताब्यात

Pimpri Chinchwad: वाहनांची तोडफोड, लूटमार करत पसरविली दहशत; एकाला अटक, २ अल्पवयीन साथीदार ताब्यात

googlenewsNext

पिंपरी : वाहनांची तोडफोड करीत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली. तसेच त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली.

आदर्श गौतम खंडारे (वय १९, रा. जाधववाडी, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शवप्पा काशिनाथ अरवत्तू (२५, रा. जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या टेम्पोमध्ये झोपले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी दगडाने व कोयत्याने गाडीच्या काचा फोडल्या. फिर्यादीवर जिवघेणा हल्ला करीत जबर जखमी केले. तसेच सुभाष दिगंबर भोसले (५२) हे त्यांच्या बसमध्ये असताना त्यांच्याही गाडीच्या काचा फोडून त्यांना हाताने मारहाण करीत खिशातील २०० रुपये आरोपींनी हिसकावून नेले. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना पकडले. आरोपीकडून पोलिसांनी ८० हजारांची दुचाकी जप्त केली. यातील आरोपी आणि दोन विधिसंघर्षित बालकांना चिखली पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिस निरीक्षक संतोष पाटील, पोलिस अंमलदार शिवाजी कानडे, बाळासाहेब कोकाटे, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, मनोजकुमार कमले, फारूक मुल्ला, अमित खानविलकर, गणेश महाडिक, सचिन मोरे, उमाकांत सरवदे, प्रमोद हिरळकर, अजित रूपनवर, प्रमोद गर्जे, मारोती जायभाये, तानाजी पानसरे, स्वप्निल महाले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Panic spread by vandalizing vehicles, looting; One arrested, 2 minor accomplices in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.