माननीयांकडून नागरी सुविधांचा पंचनामा; आरोग्य समस्येचा बोजवारा उडाल्याची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 02:39 AM2018-03-21T02:39:54+5:302018-03-21T02:39:54+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पावरील चर्चेत भाजपासह राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि अपक्ष नगरसेवकांनी नागरी सुविधांचा पंचनामा केला. सत्ताधारी भाजपाच्या काही सदस्यांनी अर्थसंकल्पांचे गोडवे गायले.

 Pankanama of civil facilities; Commenting on the debilitating health problem | माननीयांकडून नागरी सुविधांचा पंचनामा; आरोग्य समस्येचा बोजवारा उडाल्याची टीका

माननीयांकडून नागरी सुविधांचा पंचनामा; आरोग्य समस्येचा बोजवारा उडाल्याची टीका

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पावरील चर्चेत भाजपासह राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि अपक्ष नगरसेवकांनी नागरी सुविधांचा पंचनामा केला. सत्ताधारी भाजपाच्या काही सदस्यांनी अर्थसंकल्पांचे गोडवे गायले. पाणीटंचाई, आरोग्य प्रश्नाचा वाजलेला बोजवारा, पाणीपट्टी आणि मिळकतकर पाणीपुरवठा लाभकर वाढ यावर प्रकाश टाकला. आर्थिक शिस्तीबरोबरच प्रशासकीय शिस्त हवी. मेट्रोबरोबरच नागरिकांना मूलभूत सुविधांचे सक्षमीकरण करावे, अशी मागणीही केली. आजच्या दिवशी सुुमारे साडेसात तास चर्चा झाली.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पालिकेचा सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा मूळ ३५०० कोटी, तर जेएनएनयूआरएमसह ५२३५ कोटींचा अर्थसंकल्प महापालिका स्थायी समितीला सादर केला. त्यानंतर स्थायी समिती सदस्यांनी अर्थसंकल्पावर चर्चा करत उपसूचनांद्वारे २७ कोटी रुपयांची वाढ केली. तसेच, एकाच दिवशी अध्यक्षा सीमा सावळे यांनी अर्थसंकल्पाला मंजुरी देण्याचा विक्रम केला होता. यंदाचा अर्थसंकल्प उपसूचनेमुळे ५२६२ कोटी ३० लाखांवर पोहोचला होता.
त्यानंतर अर्थसंकल्पावरील विशेष सभेचे आयोजन केले होते. मात्र, दोनदा ही सभा तहकूब केली होती. गेल्या वर्षी दहा मिनिटांतच अर्थसकंल्प मंजूर केला होता. त्यामुळे भाजपा टीकेची धनी झाली होती. त्यामुळे यावर्षी चर्चा होणार किंवा नाही, याबाबत उत्सुकता होती. आज दोन टप्प्यात ही सभा झाली. सकाळी अकरा ते दुपारी सव्वा एक आणि सायंकाळी पावणेपाच ते रात्री उशिरापर्यंत सभा सुरू होती. पहिल्या टप्प्यातील चर्चेत महापौर नितीन काळजे यांनी सर्वांना बोलण्याची संधी दिली जाईल, असे सांगितले.
आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मिळकतींचे सर्वेक्षण करून कर उत्पन्न वाढविता येईल, स्मशानभूमीत सोलर यंत्रणा बसवायला हवी. स्थापत्यावरील तरतूद पूर्णपणे अंमलबजावणी केली जावी, अशी सूचना नीता पाडाळे यांनी केली. ‘मच्छरांचा त्रास वाढला आहे, जलपर्णी काढण्याची मागणी भाजपाचे हर्षल ढोरे यांनी केली. ‘लोकसंख्येच्या वाढीनुसार वाहनेही वाढली आहेत. त्यामुळे पार्किंगचे नियोजन करायला हवे. तालेरात रक्तपेढी सुरू करावी. चिंचवडला आर्ट गॅलरी उभारावी, अशी मागणी शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे यांनी केली. ‘‘समाविष्ट गावांतील आरक्षणांचा विकास करावा, अशी मागणी स्वीनल म्हेत्रे यांनी केली. अर्थसंकल्पाचे कौतुक सत्ताधाऱ्यांनी केल्यानंतर माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांनी टीका केली. डायबेटीस होईल, एवढे गोडवे गायले जात आहेत. मात्र, अर्थसंकल्पात काही गोष्टींची कमतरता आहे, ही गोष्ट मान्य करायला हवी. प्रभागांना दिलेला निधी कमी आहे. मग नियोजित विकासकामे कशी होणार?’’

लग्नाआधी बारशाचे काम
‘अपंगाना पेन्शन देण्यापेक्षा त्यांना स्वावलंबी बनवायला हवे. पेन्शन पुरेशी नाही. मेट्रोचा मोठा गाजावाजा केला. मात्र, ही मेट्रो पिंपरीपर्यंतच आहे. मेट्रोचे प्रत्यक्षात गाजरच शहरवासीयांच्या हाती पडले. ती निगडीपर्यंत नेण्याची गरज आहे. भामा आसखेडचे पैसे न भरल्याने परवनगीचीही मुदत संपली आहे. पवना धरणातून पाणी आणण्याच्या योजनेत शेतकºयांवर गोळीबार झाला. त्यामुळे खर्च वाया गेला. लग्नाच्या आधी बारसे करण्याचे काम केले जात आहे. पाण्याचा प्रश्न सोडविला नाही तर भविष्यात पाण्यावरून दगडफेक करायला नागरिक मागे पुढे पाहणार नाहीत. नाट्यगृहांचे पेव वाढत आहे. सद्याच्या नाट्यगृहात लावण्या आणि तमाशेच होत आहेत. पुढील पिढीला काय देणार आहोत, असा सवाल शिवसेनेच्या नगरसेविका मीनल यादव यांनी उपस्थित केला.

निगडीपर्यंत मेट्रोची आवश्यकता
सुरुवातीला माई ढोरे यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींवर प्रकाश टाकत, अर्थसंकल्पाचे कौतुक केले. अपंग कल्याणकारी योजना, महिला बाल कल्याणच्या योजनांचे कौतुक केले. ‘शास्तीकराबाबत विचार व्हावा, यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रियंका बारसे यांनी केली. बाबू नायर म्हणाले, ‘‘अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तातडीने करावी. डिसेंबरपर्यंत कामांचे आदेश मिळतील याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. पाणीपुरवठ्यातील गळती रोखावी. क्रीडा विभागांचे सक्षमीकरण करावे, निगडीपर्यंत मेट्रो न्यावी.’’ त्यानंतर ‘आरोग्याचा प्रश्न जटिल झाला आहे. गाड्या कमी आहेत, खरेदी करण्याची गरज असल्याचे माया बारणे म्हणाल्या.

Web Title:  Pankanama of civil facilities; Commenting on the debilitating health problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.