पोलीस आयुक्तालयात घोडेबाजार रंगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 04:19 AM2017-07-31T04:19:41+5:302017-07-31T04:19:41+5:30
बहुप्रतीक्षित पोलीस निरीक्षकांच्या बढत्या शनिवारी गृह विभागाने जारी केल्यानंतर पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील घडामोडींना भलताच वेग आला आहे.
पुणे : बहुप्रतीक्षित पोलीस निरीक्षकांच्या बढत्या शनिवारी गृह विभागाने जारी केल्यानंतर पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील घडामोडींना भलताच वेग आला आहे. काही वरिष्ठ निरीक्षकांची पदोन्नतीने बदली झाल्याने आता रिकाम्या पोलीस ठाण्यांच्या प्रभारी पदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी अनेकांनी फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे. बदल्या जाहीर झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आतच ‘क्रिम पोस्टींग’ समजल्या जाणाºया पोलीस ठाण्यांसाठी काही निरीक्षकांमध्ये चढाओढ लागली आहे.
गेल्या महिन्याभरामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये जवळपास ९० पेक्षा अधिक घरफोड्या झाल्या आहेत. चोरटे राजरोसपणे कोट्यवधींचा ऐवज लंपास करीत आहेत. शहरामध्ये वाटमाºयांच्या घटना वाढल्या आहेत. मोबाईल चोरी तर नित्याचीच झाली आहे. यासोबतच दोन गटातील हाणामारीचे प्रकारही वाढलेले आहेत.
नुकतेच समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये घुसून टोळक्याने केलेल्या तोडफोडीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. अशा एक ना अनेक घटना घडत असताना त्याकडे मात्र पोलीस अधिकाºयांचे लक्ष नाही. आपल्याला क्रिम पोस्टींग मिळावे यासाठी मात्र अनेकांची धडपड सुरु आहे.