"माझ्या मुलीच्या मारेकऱ्याला शोधा", निर्दयपणे हत्या झालेल्या विवाहित तरुणीच्या आईवडिलांचे आर्जव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 02:11 PM2022-03-30T14:11:50+5:302022-03-30T14:13:30+5:30

संशयाची पाल चुकचुकली अन्...

parents of moshi brutally murdered married girl pleads find the killer of our daughter | "माझ्या मुलीच्या मारेकऱ्याला शोधा", निर्दयपणे हत्या झालेल्या विवाहित तरुणीच्या आईवडिलांचे आर्जव

"माझ्या मुलीच्या मारेकऱ्याला शोधा", निर्दयपणे हत्या झालेल्या विवाहित तरुणीच्या आईवडिलांचे आर्जव

Next

पिंपरी : डाॅक्टर पत्नीचा निर्घृणपणे खून करून फरार झालेला तलाठी पती आठ महिन्यांपासून फरार आहे. माझ्या मुलीच्या मारेकऱ्याला शोधा, अशी याचना तिचे आईवडील करीत आहेत. मात्र अद्यापही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे ६ सप्टेंबर २०२१ रोजी खुनाची ही घटना उघडकीस आली होती.

सरला विजय साळवे (वय ३२), असे खून झालेल्या महिला डाॅक्टरचे नाव आहे. तर विजयकुमार गजानन साळवे (वय ३२, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) असे फरार झालेल्या आरोपी तलाठी पतीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भंडारा जिल्ह्यातील सरला आणि गोंदिया जिल्ह्यातील विजयकुमार यांचा २०१९ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांनी बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे फ्लॅट खरेदी केला. नवीन फ्लॅटची ४ सप्टेंबर २०२१ रोजी वास्तूशांत केली. त्यानंतर विजयकुमार याने सरला यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर चिठ्ठी लिहून तो फरार झाला.

संशयाची पाल चुकचुकली अन्

प्रेमविवाह केलेल्या सरला आणि विजयकुमार यांचा सुखी संसार सुरू होता. मात्र विजयकुमार याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि तेथेच त्यांच्या प्रेमाला दृष्ट लागली. तरीही त्यांनी बोऱ्हाडेवाडी येथे नवीन फ्लॅट खरेदी करून त्याची वास्तूशांतही केली. मात्र मनातील संशय विजयकुमारला शांत बसू देत नव्हता. त्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले.

सरला आणि विजयकुमार यांच्या प्रेमाचा संमती देत आम्ही त्यांचे लग्न लावून दिले. विजयकुमार याचा जावई म्हणून स्वीकार केला. आम्ही आमच्या मुलीला गमावले आहे. तिच्या मारेकऱ्याचा शोध घेऊन न्याय मिळणे अपेक्षित आहे.

- नोंदराज शिवरकर (मयत सरला यांचे वडील), भंडारा

आरोपीच्या शोधासाठी वेळोवेळ पथके रवाना केली होती. त्याच्या नातेवाईक, मित्रांकडेही चौकशी केली. तांत्रिक विश्लेषण करून देखील तपास सुरू आहे.

- डाॅ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त

Web Title: parents of moshi brutally murdered married girl pleads find the killer of our daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.