पालक-शिक्षक महोत्सव उत्साहात
By admin | Published: February 15, 2017 01:59 AM2017-02-15T01:59:56+5:302017-02-15T01:59:56+5:30
येथील ज्ञानप्रबोधिनी येथे निगडी पालक महासंघ आयोजित पालक-शिक्षक क्रीडा महोत्सवाच्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले.
निगडी : येथील ज्ञानप्रबोधिनी येथे निगडी पालक महासंघ आयोजित पालक-शिक्षक क्रीडा महोत्सवाच्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले.
वैष्णवी पित्रे, हेमंत थोरात, सायली देशपांडे, प्रतिभा दलाल यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
मनोज देवळेकर अध्यक्षस्थानी होते; तसेच उद्योजक नितीन ढमाले, सुभाष राणे यांची या प्रसंगी मुख्य उपस्थिती होते. भगतसिंग मोरे यांनी प्रास्ताविक केले.
यंदाच्या पाचव्या पालक - शिक्षक वार्षिक क्रीडा महोत्सवातील सांघिक आणि वैयक्तिक विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. वैयक्तिक बक्षिसांचा तपशील खालीलप्रमाणे :-
लांब उडी : चाळीस वर्षांवरील महिला : वैष्णवी पित्रे (प्रथम), चाळीस वर्षांवरील पुरुष : हेमंत थोरात (प्रथम).
गोळाफेक : चाळीस वर्षांवरील महिला : प्रतिभा दलाल (प्रथम), चाळीस वर्षांवरील पुरुष : प्रदीप भिसे (प्रथम).
शंभर मीटर धावणे : चाळीस वर्षांवरील महिला : सायली देशपांडे (प्रथम).
लांब उडी : चाळीस वर्षांखालील महिला : वनिता सावंत (प्रथम), चाळीस वर्षांखालील पुरुष : प्रीतमकुमार महाजन (प्रथम).
गोळा फेक : चाळीस वर्षांखालील पुरुष : कुंदन चौधरी (प्रथम). टेबल टेनिस : महिला : नीता मोहिते (प्रथम), पुरुष : राजेश बेडेकर (प्रथम). क्रिकेट : महिला : उत्कृष्ट फलंदाज - रंजना सुसर, पुरुष : उत्कृष्ट गोलंदाज - सचिन संकपाळ.
कार्यक्रमाच्या संयोजनात नवनाथ नरळे, विजय नाईक, शंकर घोलप, श्वेता दामले, सीमा संचेती, लक्ष्मण भणगे, अर्जुन दलाल, नितीन बारणे, किशोर जाधव, विवेक कुलकर्णी यांनी सहकार्य केले. श्रीराम कुंटे यांनी सूत्रसंचालन केले. विवेक केळकर यांनी आभार मानले.(वार्ताहर)