पारगावला पोलिसांनी दोन अल्पवयीन विवाह रोखले

By admin | Published: March 12, 2016 01:28 AM2016-03-12T01:28:57+5:302016-03-12T01:28:57+5:30

पारगाव (ता. दौंड) येथे होणारे दोन अल्पवयीन चिमुकल्या जोडप्यांचे विवाह यवत पोलीस व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे थांबवण्यात आले.

Pargaon police stopped two minor marriages | पारगावला पोलिसांनी दोन अल्पवयीन विवाह रोखले

पारगावला पोलिसांनी दोन अल्पवयीन विवाह रोखले

Next

केडगाव : पारगाव (ता. दौंड) येथे होणारे दोन अल्पवयीन चिमुकल्या जोडप्यांचे विवाह यवत पोलीस व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे थांबवण्यात आले. पारगाव परिसरात देलवडी -पारगाव रस्त्याच्या कडेला देऊळवाले लोकवस्तीत सदरचे विवाह आज शुक्रवारी (दि. ११) दुपारी दोन वाजता होते.
जोडपी अल्पवयीन असल्याची खबर यवत पोलिसांना लागली. प्रसंगावधान राखून विवाहापूर्वी पोलिसांचे पथक पारगावला विवाहस्थळी दाखल झाले. या वेळी ५00 वऱ्हाडी उपस्थित होते. लक्ष्मण गायकवाड व राहुल गायकवाड यांचा विवाह अनुक्रमे राणी जाधव व संगीता निंबाळकर यांच्याशी होणार होता. सर्व वधू व वर बारा ते अठरा वयोगटातले होते. पोलिसांनी नवरदेवांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलीस हवालदार शितोळे, नगरे, हजारे व कदम यांनी सहभाग घेतला. याबाबत देऊळवाले समाजाचे प्रमुख सुरेश निंबाळकर म्हणाले, की सदरचा कार्यक्रम विवाह नसून साखरपुडा होता. वधू-वर वयाची अट पूर्ण केल्यावरच संबंधित विवाह भविष्यात केला जाईल. अल्पवयीन विवाह ही समाजपरंपरा असून, यापूर्वी अनेकदा असे प्रकार घडले आहेत. परंतु प्रथमच पोलिसांसमोर हा प्रकार उघडकीस आल्याचे एका जाणकार व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Pargaon police stopped two minor marriages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.