नो पार्किंगमध्ये सर्रास होतेय पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:35 AM2018-08-29T01:35:20+5:302018-08-29T01:35:41+5:30

रहाटणी परिसर : वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाढली वाहनचालकांची मुजोरी

Parking in front of no parking | नो पार्किंगमध्ये सर्रास होतेय पार्किंग

नो पार्किंगमध्ये सर्रास होतेय पार्किंग

googlenewsNext

रहाटणी : पिंपरी-चिंचवड वाहतूक सुरळीत व्हावी, शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडी पासून सुटका मिळावी म्हणून शहरातील अनेक रस्त्याची रुंदी करण्यात आले. मात्र शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी ती वाढतच आहे. त्याचे कारण रस्त्याच्या दुतर्फा व चौकाचौकांमध्ये अनधिकृत पार्किंग आहे, ज्या ठिकाणी नो -पार्किंग आहे त्या ठिकाणी वाहनचालक आपले वाहन सर्रास पार्क करत असल्याने स्थानिक नागरिकांना व वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे मात्र वाहतूक पोलीस यात कुठेतरी कमी पडत आहेत का अशी शंका यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे. तर नो पार्किंग मध्ये उभे केलेल्या वाहनांना अभय कुणाचे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

काळेवाडी फाटा ते एम.एम. शाळा बीआरटीएस रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा नो पार्किंगची बोर्ड असले तरी या रस्त्यावर बीआरटी मार्गात अनधिकृत पार्किंग मोठ्या प्रमाणामध्ये केली जात आहे.

रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्किंग करून इतर वाहनांना मोठी अडचण निर्माण केली जात आहे मात्र याकडे वाहतूक पोलीस डोळेझाक करत असल्याची तक्रार काही स्थानिक नागरिक करत आहेत रस्त्याच्या कडेला महिन्याने महिने एकाच जाग्यावर अनेक वाहने उभे केलेले आहेत मात्र यांचे मालक कोण या पार्किंगला अभय कोणाचा हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे मागील अनेक दिवसांपासून या परिसरांमध्ये नो पार्किंग वर वाहतूक पोलिसांची कारवाई झाली नसल्याचे येथील स्थानिक व्यवसायिक व रहिवासी सांगत आहेत.

मात्र वाहतूक पोलिस नो पार्किंगवर उभ्या असलेल्या वाहनांवर का कारवाई करत नाहीत हाच खरा प्रश्न आहे सांगवी वाहतूक विभागाकडून नो पार्कमधल्या वाहनावर कारवाई करण्यासाठी फक्त कुणाल आयकॉन रस्त्यावरच दुचाकी वाहने उचलण्याचे काम केले जाते जॅमर लावण्याचे काम केले जाते कुणाल आयकॉनरस्ता ते कोकणे चौक प्रामुख्याने याच भागात कारवाई केल्याचे दिसून येते.

मात्र काळेवाडी फाटा ते एम एम शाळा व इतर परिसरामध्ये नो पार्किंग मधील वाहनांवर कारवाई करताना दिसून येत नाही अशी वाहतूक पोलिसांची दुटप्पी भूमिका का? जर कारवाई करायचीच असेल तर ज्या-ज्या ठिकाणी नो पार्किंग आहे त्या-त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

अगदी काळेवाडी फाटा ते एम एम शाळा या रस्त्यावर दुतर्फा अनेक ठिकाणी नो पार्किंग बोर्ड लावले असले तरी त्याच बोर्डाच्या शेजारी अनेक वाहन रात्रंदिवस उभ्या असतात त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. तापकीर चौक सकाळी-संध्याकाळी मृत्यूचा सापळा झाल्याचे दिसून येत आहे. रहाटणी फाटा ते तापकीर चौकादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. तरीही वाहतूक पोलीस डोळेझाक का करीत आहेत, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत.

रहाटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर या परिसरातील मुख्य रस्त्यावर नो पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या वाहनांवर कारवाई न करणे म्हणजे या रस्त्यावरील स्थानिक व्यवसायात व्यवसायिकांकडून काहीतरी आर्थिक लागेबांधे संबंध असल्याशिवाय कारवाई न करण्याचा पवित्रा पोलीस घेऊ शकत नाहीत, अशी शंका येथील रहिवासी व्यक्त करत आहेत. दुकानांसमोर वाहने लावू दिल्यास आपल्या व्यवसायावर आर्थिक परिणाम होईल म्हणून व्यावसायिकांनी दुकानासमोरील वाहने उचलण्यासाठी महिन्याकाठी काही आर्थिक देवाण-घेवाण करण्याचे ठरले असल्याने काळेवाडी फाटा ते एम एम शाळा दुतर्फा रस्त्यावर व शिवार चौक ते साई चौक तसेच शिवार चौक ते कोकणे चौक या दुकानासमोरील वाहनांना वाहतूक पोलिसांकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. मात्र या वाहनांचा त्रास वाहनचालक व रस्त्याने ये-जा करणाºया सर्वसामान्य नागरिकांना होत आहे यावर पालिका प्रशासनाचे संबंधित विभाग व सांगवी वाहतूक विभाग आणि यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी वाहनचालक व नागरिक करीत आहेत

काळेवाडी फाट्यावर नो पार्किंगच्या बोर्ड लगतच पिंपरी ला जाणाºया रिक्षा उभ्या केलेल्या असतात या रिक्षा रांगेत नव्हे जागा मिळेल तिथं उभ्या करून प्रवासी भरतात. त्यांच्या शेजारीच वाहतूक पोलीस उभे असतात. तरी याकडे काणाडोळा केला जातो. मात्र एखादे वाहन सुरळीत जात असेल तर वाहतूक पोलीस त्याला अडवून दंडाची पावती करतात. मात्र या नो पार्किंंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना वाहतूक पोलिसांचे अभय आहे की काय असेच या निमित्ताने दिसून येत आहे.

काळेवाडी फाटा येथील उड्डाणपुलाखाली अनेक वाहने चारचाकी सहासीटर रिक्षा, बसेस उभ्या केलेल्या असतात. या उभ्या केलेल्या नो पार्किंगच्या वाहनांना अभय कुणाचे हा खरा प्रश्न आहे. हीच परिस्थिती साई चौक ते शिवार चौक कोकणी चौकाची आहे. या रस्त्यावर नो पार्किंग असले तरी फुटपाथवर अनेक वाहने लावलेली असतात. तरी वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहेत. नो पार्किंगच्या बोर्डशेजारीच तेही फुटपाथवर नागरिकांना चालता येणार नाही अशाप्रकारे दुचाकी, चारचाकी वाहने लावलेली दिसून येत आहेत. नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे हा प्रश्न आहे.


मनमानी पद्धतीने पार्किंग

चिंचवड : वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी चिंचवड वाहतूक शाखेच्या वतीने चिंचवड परिसरातील मुख्य चौक व रस्त्यांवर सम-विषम र्पाकिंग व नो र्पाकिंग झोन ठरविला आहे. या बाबतचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र अशा भागात कारवाईच होत नसल्याने वाहनचालक मनमानी पद्धतीने वाहने पार्क करत आहेत. वाहतूक शाखा या भागात कारवाई करत नसल्याने र्पाकिंग फलक हा देखावा ठरत आहे.

चिंचवड स्टेशनकडून चापेकर चौकाकडे जाणाऱ्या दुतर्फा मार्गावर सम-विषम र्पाकिंग झोन ठरविण्यात आला आहे. या भागात सूचनाफलकही लावण्यात आले आहेत. अत्यंत वर्दळीच्या असणाºया या मार्गावर मोठी वर्दळ असते. नामांकित बँक व व्यावसायिकांची दुकाने, शोरूम या भागात असल्याने येथे मोठी रहदारी असते. या भागातील रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतूककोंडी ही मुख्य समस्या निर्माण झाली आहे. वाहतूक शाखा या भागात कारवाई करीत नसल्याने वाहनचालक मनमानी पद्धतीने वाहने पार्क करतात. अहिंसा चौकात सायंकाळी खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या रस्त्यावर उभ्या असतात. यामुळे वाहतुकीचा खोळंबा नित्याचाच झाला आहे. चापेकर चौकात व उड्डाण पुलाखाली नो र्पाकिंग झोनचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र वाहतूक नियमांची पायमल्ली करत या भागात वाहने उभी केली जातात. अशा वाहनांमुळे पादचाºयांना त्रास होत आहे. वाहतूककोंडी ही मुख्य समस्या चौकात निर्माण होत आहे.

Web Title: Parking in front of no parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.