स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी व्हा - नितीन काळजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 03:29 AM2018-01-29T03:29:38+5:302018-01-29T03:30:03+5:30
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या सहभागाशिवाय शहर स्वच्छतेचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकत नाही. तरी सर्व शहरवासीयांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले.
पिंपरी : शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या सहभागाशिवाय शहर स्वच्छतेचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकत नाही. तरी सर्व शहरवासीयांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत स्वच्छ पिंपरी-चिंचवड शहरातील महाविद्यालय, हॉटेल, शाळा, गृहनिर्माण संस्था, मोहल्ला मार्केट, मंडई या ठिकाणी स्वच्छ भारत सुदृढ भारत या विषयावर स्पर्धा घेऊन जनजागृती करण्यात आली. घेण्यात आलेल्या
स्वच्छ स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
आज महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमास उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, जैवविविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंडे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, अर्चना बारणे, सुवर्णा बुरडे, कमल घोलप, सहआयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
महापौर नितीन काळजे म्हणाले, ‘‘शहर स्वच्छ करण्यासाठी सर्व वयोगटांतील शहरवासीयांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. शहरवासीयांनी स्वत:हून काळजी घेतली, तर शहर स्वच्छ व सुंदर राहील. स्वच्छ भारत अभियानामध्ये शहराचा क्रमांक अव्वलस्थानी येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.’’
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘स्वच्छ भारत अभियानात सर्व नागरिकांना सहभागी करून घेणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयक जनजागृती करून त्यांची मानसिकता बदलायला हवी. लोकांनी मानसिकता बदलली, तर शहर व देश स्वच्छ होईल.
शहरातील सर्व मोठ्या सोसायट्या व हॉटेलना कचºयाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज आहे. स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेणारे सर्व नागरिक हेच खºया अर्थाने स्वच्छ भारत अभियानाचे ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर आहेत.’’
प्रास्ताविक सहआयुक्त दिलीप गावडे यांनी केले, तर सूत्रसंचालन सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले.
जनजागृती : शाळा, महाविद्यालयांचा वाढता सहभाग
पंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत महाविद्यालय, शाळांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. अनेक शाळा स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे शहरामध्येही स्वच्छतेसाठी नागरिक जागरुक झाले आहेत. अनेक जणांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड केले आहेत. शहर परिसरात कचरा दिसताच त्याबाबतची माहिती तात्काळ दिली जात आहे. तसेच प्रशासनाकडून याबाबत कार्यवाहीही करण्यात येत आहे. शहर स्वच्छ बनवण्यासाठी मोठ्या हिरीरीने नागरिक सहभागी होत आहेत. काही संस्था, संघटनेच्या वतीने नदीपात्राचे स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याला प्रतिसाद मिळत आहे.