सिंहगड एक्सप्रेस उशिरा आल्याने लाेणावळ्यात प्रवासी संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 05:39 PM2019-07-22T17:39:46+5:302019-07-22T17:46:09+5:30
पुण्याकडून मुंबईला निघालेली सिंहगड एक्सप्रेस लाेणावळा स्थानकात उशीरा येत असल्याने आज प्रवशांनी रेल्वे अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला.
लोणावळा : पुण्याहून मुंबईकडे जाणारी सिंहगड एक्सप्रेस गाडी लोणावळा स्थानकात उशिरा आल्याने संतप्त प्रवाश्यांनी रेल्वे अधिकार्यांना घेराव घालत संताप व्यक्त केला. रेल्वेला उशीर हाेत असल्याने प्रवाशांना मुंबईत पाेहचण्यास उशीर हाेताे. परिणामी नाेकरदारांना लेट मार्क लागताे.
लोणावळा तसेच मावळ भागातून मुंबई परिसरात कामाकरिता जाणार्या प्रवाश्यांची संख्या मोठी आहे. सिंहगड एक्सप्रेसची बाेगी लोणावळ्यात उघडत असल्याने लोणावळा स्थानकावर प्रवाश्यांची गाडीत बसण्याकरिता गर्दी असते. सकाळच्या वेळेत जलद गाड्या तसेच लोकलची वर्दळ जास्त असल्याने गाडी स्थानकात पोहचण्यास उशिर होतो. आज गाडी काही वेळ उशिराने आल्याने प्रवाश्यांनी संताप व्यक्त करत रेल्वे अधिकार्यांना घेराव घातला.
सिंहगड एक्सप्रेस थांबवून मालगाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याची ओरड प्रवाशांकडून होत आहे. एक्सप्रेस ला उशीर होत असल्याने अनेकांना याचा फटका बसतो. त्यामुळे चिडलेल्या नोकरदार वर्गाने आज रेल्वे प्रशासनाला जाब विचारला.