साथीच्या आजारांनी रुग्णालयांत वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:06 AM2018-08-29T01:06:28+5:302018-08-29T01:07:04+5:30

क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण : वायसीएम प्रशासनावर अतिरिक्त ताण

Patients grew up in clinical patients in pune | साथीच्या आजारांनी रुग्णालयांत वाढली गर्दी

साथीच्या आजारांनी रुग्णालयांत वाढली गर्दी

Next

पिंपरी : शहरामध्ये साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. बदलत्या वातावरणामुळे डेंगी, स्वाइन फ्लू, मलेरिया या आजारांनी नागरिकांना ग्रासले आहे. या जीवघेण्या आजारांमुळे शहरातील चव्हाण रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. खाटांची क्षमता कमी पडत असल्यामुळे रुग्णांवर उपचार करताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.

वायसीएम रुग्णालयामध्ये ७५० खाटांची क्षमता आहे. रुग्णालयाच्या काही विभागामध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असल्याने खाटांची क्षमता अपुरी पडत आहे. शहरामध्ये आजारांची साथ आल्याने नागरिकांना हिवताप, सर्दी, खोकला व इतर जीवघेण्या आजारांची लागण होत आहे. उपचारासाठी अनेक रुग्ण रुग्णालयामध्ये भरती होत आहेत. पावसाळ््यामुळे डेंगीचा प्रादुर्भावही वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. संशयित रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे.

मागील एक महिन्यापासून रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तसेच शहरातील विविध रुग्णालयांचे विस्तारीकरण व नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथील रुग्ण उपचारासाठी वायसीएममध्ये येतात. परिणामी वायसीएममध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल झाल्याने वायसीएम प्रशासनाची उपचार करत असताना दमछाक होत आाहे. डेंगीचे डास वाढणार नाहीत यासाठी पाण्याच्या टाक्या, हौद व पाणी साठविण्याची भांडी रोज कोरडी करावी. घरातील मोठ्या टाक्यांना झाकण बसवावे. फ्लॉवरपॉट, कुलर, फ्रीज ट्रेमधील पाणी बदलावे. कामाच्या ठिकाणी व घरामध्ये डास चावणार नाही याची दक्षता घ्यावी. घर परिसरातील भंगार मालाची विल्हेवाट लावावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

गेल्या महिन्याभरापासून आजारांचे प्रमाण वाढले आहे. शहरामध्ये अनेक साथीच्या आजारांनी थैमान घातले असल्यामुळे वायसीएममध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल होत असल्यामुळे प्रशासनावर ताण येत आहे. ७५० खाटांची क्षमता आहे. मात्र त्यापेक्षा जास्त रुग्ण दाखल होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवरही अतिरिक्त ताण येत आहे. तसेच काही रुग्णांना डिस्चार्ज देऊन नवीन रुग्णांना भरती केले जात आहे.
    - मनोज देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, वायसीएम रुग्णालय

 

Web Title: Patients grew up in clinical patients in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.