Pavana Dam: पवना धरण ९१ टक्के भरले; विसर्ग वाढवणार, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

By विश्वास मोरे | Published: August 1, 2024 12:11 PM2024-08-01T12:11:40+5:302024-08-01T12:12:23+5:30

नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत

Pavana Dam 91 percent full Discharge will increase people on the banks of the river are alerted | Pavana Dam: पवना धरण ९१ टक्के भरले; विसर्ग वाढवणार, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

Pavana Dam: पवना धरण ९१ टक्के भरले; विसर्ग वाढवणार, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

पिंपरी: पिंपरी चिंचवड ला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण (Pavana Dam) ९१ टक्के भरले आहे भरलेले आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार आहे.  दुपारी एक वाजल्यापासून ३२०० क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. 

 मावळातील पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात  पावसाचा जोर वाढलेला आहे. पाणी पातळीत व धरणाच्या येव्यामध्ये होणारी वाढ विचारात घेता धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता आज दुपारी एक वाजल्यापासून  पवना धरणाच्या सांडव्यावरून  इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जलविद्युत केंद्रामधून विदुयतगृहाद्वारे १४०० इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग सुरू असून एकुण ३२०० क्यूसेक इतक्या क्षमतेने नदी पात्रामध्ये विसर्ग होणार आहे. पाणलोट क्षेत्रात होणा-या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी,जास्त करण्यात येईल.
 
 पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत  जलसंपदा विभागास, प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Pavana Dam 91 percent full Discharge will increase people on the banks of the river are alerted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.