Pavana Dam: पवना धरण सद्यस्थितीत ९४ टक्के भरले; ८ हजार ९०० क्युसेक पाणी सोडले
By विश्वास मोरे | Published: August 4, 2024 02:20 PM2024-08-04T14:20:53+5:302024-08-04T14:21:54+5:30
नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत
पिंपरी : पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की पवना धरण सद्यस्थितीत ९४ टक्के भरलेले एकुण ८९०० क्युसेक पाणी सोडले आहे. तर मावळात पाच तासात १५० मिमी पाऊस पडला आहे. तर २४ तासात २३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मावळ तालुका परीसरात जोरदार पाऊस सुरू आहे. पवना धरणाच्या सांडव्यावरून ५६७० क्युसेक् पाणी सोडले आहे. जलविद्युत केंद्रामधून विदुयतगृहाद्वारे १४००असा एकुण ७०७० क्युसेक इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग चालू आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला असल्याने पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता दुपारी १२ वाजता व सांडव्यावरून विसर्ग वाढवला आहे. एकुण ८९६० कयुसेक इतक्या क्षमतेने विसर्ग होणार आहे.
पाणलोट क्षेत्रात होणा-या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी, जास्त करण्यात येईल. पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षने केले आहे.