पवना धरण 100 टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2017 01:32 PM2017-08-13T13:32:04+5:302017-08-13T13:32:04+5:30

Pawan dam completes 100 percent | पवना धरण 100 टक्के भरले

पवना धरण 100 टक्के भरले

Next

पिंपरी, दि. 13 - पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असणारे पवना धरण रविवारी सकाळी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत पिंपरी-चिंचवडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

 पिंपरी-चिंचवड शहरास मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा होता. गेल्या दोन महिन्यांपासून मावळात पाऊस सुरू आहे. त्यामुळे पवना धरणाच्या पातळीत वाढ होत होती. ८२ टक्के पाणी साठा झाल्यानंतर दोन हजार क्युसेवक पाणी धरणातून सोडले होते. काल दिवसभरात झालेल्या २७  मिमी पावसाने धरणसाठा शंभर टक्क्यांवर गेला. तर धरण परिसरात एक जूनपासून २ हजार ४३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या ८.५१२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. हैड्रोगेटद्वारे विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी एक हजार ४५९  क्युसेक्सने पाणी नदीत सोडण्यात येत आहे. 

दोन महिन्यात धरण फुल

गेल्यावषीर्ही आॅगस्ट महिन्यात पवना धारण फुल्ल झाले होते. यंदाही पाऊस चांगला झाल्याने धरण वेळेत भरले आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे धरण भरले याचा आनंद असला तरी बळीराजा अजूनही पावसाची आतुरतेने वाट पाहात आहे. मावळात काही ठिकाणी भातलागवडीची कामे सुरू आहेत. आणखी पाऊस होईल, अशी शक्तयता वेधशाळेने वर्तविली आहे. 

Web Title: Pawan dam completes 100 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.