पवना धरण ९७.१७ टक्के भरले; १२०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 10:00 AM2019-08-03T10:00:59+5:302019-08-03T10:02:13+5:30
गेल्या चोवीस तासात ११५ मिमी पावसाची नोंद झाली असुन १ जून ते आज अखेर एकुण २१३३ मिमी पाऊस झाला आहे.
पवनानगर : पवनमावळ परिसरात संततधार सुरुच असल्याने आज (शनिवार, दि. ३) सकाळी सहापासून पवना धरणाच्या जल विद्युत केंद्रातून १२०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग पवनानदी पात्रात सुरु करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार धरणसाठ्यात घसघशीत वाढ होऊन धरणात ९७.१७ जलसाठा आहे. गेल्या चोवीस तासात ११५ मिमी पावसाची नोंद झाली असुन १ जून ते आज अखेर एकुण २१३३ पाऊस झाला आहे. यामुळे नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर वाढल्यास आवश्यकतेनुसार पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती पवनाधरण शाखा अभियंता ए. एम. गदवाल यांनी सांगितले आहे.पवनाधरणातून शनिवारी १२०० क्यूसेसने पाणी सोडण्यात येणार
पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने शनिवारी सकाळी पवनाधरणातून १२०० क्यूसेसने पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पिंपरी चिंचवड शहराला मावळातील पवना धरण परिसरातून पाणी पुरवठा होतो. पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. जलाशयात होणारी वाढ आणि धरण परिसरातही पाऊस यामुळे धरणातून विसर्ग सोडावे लागणार आहे. शनिवारी सकाळी पवनाधरणातून १२०० क्यूसेसने पाणी सोडण्यात येणार आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात येणार आहे.
महापालिका आपत्कालीन विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.