पोलिस होण्यासाठी १० लाख रुपये द्या! नोकरीच्या अमिषाने फसवणूक, दोघांच्या विरोधात गुन्हा

By रोशन मोरे | Published: August 18, 2023 04:07 PM2023-08-18T16:07:29+5:302023-08-18T16:08:23+5:30

या प्रकरणी महिलेने गुरुवारी (दि.१७) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली...

Pay 10 lakhs to become a police! Cheating with lure of job, crime against both | पोलिस होण्यासाठी १० लाख रुपये द्या! नोकरीच्या अमिषाने फसवणूक, दोघांच्या विरोधात गुन्हा

पोलिस होण्यासाठी १० लाख रुपये द्या! नोकरीच्या अमिषाने फसवणूक, दोघांच्या विरोधात गुन्हा

googlenewsNext

पिंपरी :पोलिस खात्यात नोकरी लावून देतो, या अमिषाने तब्बल १० लाख रुपये घेत फसवणूक केली. ही घटना तीन डिसेंबर २०२२ रोजी तळेगाव दाभाडे येथे घडली. या प्रकरणी महिलेने गुरुवारी (दि.१७) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संतोष बाबासो कदम (वय ५०), सनद संतोष कदम (२६),संकेत संतोष कदम (२६, सर्व रा. खारघर, नवी मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१९ पासून संशयितांनी फिर्यादीच्या पतीला पोलिस खात्यात नोकरी लावण्याचे अमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादीच्या पतीच्या विश्वास संपादन करून तीन डिसेंबर २०२२ ला फिर्यादीच्या घरी पाच लाख रुपये घेतले. तसेच पुन्हा २८ फेब्रुवारी २०२३ ला पुन्हा पाच लाख रुपये फिर्यादीच्या मैत्रीणी समोर घेतले. दहा लाख रुपये घेत संशयितांनी फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Pay 10 lakhs to become a police! Cheating with lure of job, crime against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.