PCMC: चिखली व तळवडेसह परिसरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तब्बल ७ नवीन रस्ते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 01:14 PM2023-10-24T13:14:11+5:302023-10-24T13:29:16+5:30

रस्त्यासाठी जागा ताब्यात घेण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने विशेष शिबिराचे आयोजन केले आहे....

PCMC: As many as 7 new roads to decongest the area including Chikhli and Talwade | PCMC: चिखली व तळवडेसह परिसरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तब्बल ७ नवीन रस्ते

PCMC: चिखली व तळवडेसह परिसरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तब्बल ७ नवीन रस्ते

पिंपरी : चिखली व तळवडेसह परिसरात वाहतूक कोंडी सोडवण्याच्या तब्बल ७ नवीन रस्त्यांच्या कामाला प्रशासनाने गती दिली आहे. रस्त्यासाठी जागा ताब्यात घेण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.

चिखली, तळवडे परिसरात अरुंद रस्ते असल्यामुळे वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. नोकरदार, नागरिक वाहतूककोंडीविरोधात संताप व्यक्त करत आहेत. प्रशासनाकडे पर्यायी नवीन रस्त्यांची मागणी करण्यात आली. त्याबाबत सल्लागार नियुक्ती केली. त्यानंतर जागेची मार्किंग आणि आयडेंटिफिकेशन करण्यात आले. त्याला संबंधित कमिटींची मान्यता मिळाली. जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. चिखली व तळवडे येथील मंजूर विकास योजनेतील ७ रस्त्यांसाठी जागा ताब्यात घेण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. बाधित नागरिकांची यादी तयार केली आहे. त्यानुसार संबंधित जमीन मालकांना 'अ' व 'ब' प्रपत्राचे वाटप, वाटाघाटी याबाबत शिबिरात मार्गदर्शन करण्यात येईल.

चिखली-तळवडे गावठाण

प्रशासनाने चिखली आणि तळवडेतील नवीन सात रस्त्यांना मंजुरी दिली. त्यानंतर आता येत्या दि. २६ , २७ ऑक्टोबर रोजी चिखली-तळवडे गावठाण येथील महापालिका शाळेत या शिबिराचे आयोजन केले आहे.

रस्त्यांसाठी होणार भूसंपादन!

1) इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते संतपीठाकडे जाणारा १२ ते १८ मीटर रुंद डीपी रस्ता

2) साने चौक ते चिखली गाव १२ ते २४ मीटर, ३० मीटर रुंद रस्ता

३) देहू आळंदी ते सोनावणे वस्तीकडे जाणारा ३० मीटर रुंद रस्ता

४) चिखली चौक ते सोनावणे वस्तीकडे जाणारा २४ मीटर रुंद रस्ता

५) त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौकापर्यंत २४ मीटर रुंद रस्ता

६) तळवडे कॅनवे चौक ते निगडी स्पाइन रस्त्याला जोडणारा १८ मीटर रस्ता

७) नदीच्या कडेने जाणारा १२ मीटर रस्ता व चिखली तळवडे शिवेवरील २४ मीटर रस्ता

चाकण औद्योगिकपट्टा, तळवडे आयटी पार्क या भागातून देहूरोड आणि अन्य भागांत होणारी वाहतूक सक्षम करण्यासाठी तळवडे आणि चिखली गावाबाहेरून नवीन रस्ते प्रस्तावित केले आहेत. १२ किलोमीटर नवीन पर्यायी रस्ते उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांना भेडसावणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

- महेश लांडगे, आमदार

Web Title: PCMC: As many as 7 new roads to decongest the area including Chikhli and Talwade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.