PCMC: महापालिका योजनांचा लाभ देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा

By विश्वास मोरे | Published: February 4, 2024 04:34 PM2024-02-04T16:34:04+5:302024-02-04T16:34:40+5:30

योजनांच्या पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करणे, त्यांचे आधार कार्डसह एकत्रितकरण आणि लाभार्थ्यांना योजनांशी जोडन्यात येणार आहे....

PCMC Developed Bharat Sankalp Yatra to benefit municipal schemes | PCMC: महापालिका योजनांचा लाभ देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा

PCMC: महापालिका योजनांचा लाभ देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा

पिंपरी : महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गंत ४२ ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन केले आहे. योजनांच्या पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करणे, त्यांचे आधार कार्डसह एकत्रितकरण आणि लाभार्थ्यांना योजनांशी जोडन्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील विकसित भारत संकल्प यात्रेचा २१ दिवसांचा दुसरा टप्पा ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. २५ फेब्रुवारी कालावधीत “विकसित भारत संकल्प यात्रा” चे आयोजन केले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ वाहनाचे उद्घाटन सोमवारी दुपारी ३ वाजता आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे.

नगर विकास विभागाकडून केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी), प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), स्वच्छ भारत अभियान (नागरी), प्रधानमंत्री ई- बस, सेवा व अमृत योजना यांसह अनेक योजना राबविल्या जातात, या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी योजनांबाबतची जनजागृतीसाठी उपक्रम आहे.

वाहन यात्रा उद्यापासून मनपाच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गंत ४२ ठिकाणी काढण्यात येणार आहे. यात्रेद्वारे योजनांच्या लाभार्थ्यांची ऑनबोर्डिंग करणे, पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करणे, त्यांचा तपशील आधार कार्डसह एकत्रित करणे, लाभार्थ्यांना योजनांशी जोडणी करणे यासह इतर योजनांसाठी महापालिका अधिकारी, कर्मचा-यांच्या सहकार्यातून मोहिम राबण्यात येईल.

- शेखर सिंह महापालिका आयुक्त पिंपरी-चिंचवड

Web Title: PCMC Developed Bharat Sankalp Yatra to benefit municipal schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.