PCMC| मिळकत कर भरा, अन्यथा फ्लॅट जप्त; सहाशे सोसायट्यांना नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 03:11 PM2022-09-22T15:11:31+5:302022-09-22T15:13:40+5:30

शहरातील सहाशेपेक्षा अधिक सोसायट्यांच्या अध्यक्ष, सचिवांना महापालिकेने नोटिसा दिल्या आहेत...

pcmc Pay property tax otherwise flat will be confiscated Tax Collection Department Notices 600 Societies | PCMC| मिळकत कर भरा, अन्यथा फ्लॅट जप्त; सहाशे सोसायट्यांना नोटिसा

PCMC| मिळकत कर भरा, अन्यथा फ्लॅट जप्त; सहाशे सोसायट्यांना नोटिसा

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी मोहीम सुरू केली आहे. शहरातील फ्लॅटधारकांनी कर न भरल्यास फ्लॅट जप्त करण्याचा इशारा कर संकलन विभागाने दिला आहे. यासाठी शहरातील सहाशेपेक्षा अधिक सोसायट्यांच्या अध्यक्ष, सचिवांना महापालिकेने नोटिसा दिल्या आहेत.

कर थकीत असणाऱ्या फ्लॅटधारकांकडे कर संकलन विभागाने मोर्चा वळविला आहे. वाकड, थेरगाव, सांगवी, मोशी आणि चऱ्होली या भागातील ६०० पेक्षा अधिक गृहनिर्माण सोसायट्यांना नोटिसी दिल्या आहेत. त्यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक फ्लॅटधारकांनी कर न भरलेल्या सोसायट्यांच्या अध्यक्ष, सचिवांचा समावेश आहे. या फ्लॅटधारकांनी त्वरित कर न भरल्यास त्यांचा फ्लॅट जप्त करणे, पाणीपुरवठा खंडित करणे अशी कारवाई महापालिका प्रशासन करणार आहे.

महापालिकेचे अधिकृत ओळखपत्र व मालमत्ता जप्ती कारवाईचे अनुषंगाने आदेश, कागदपत्रे आदी असलेल्या संबंधित महापालिका कर्मचाऱ्यांना सोसायटीमध्ये प्रवेश देण्याबाबत सोसायटीतील सुरक्षारक्षकांना सूचना द्याव्यात. सोसायटीमध्ये प्रवेश देत नसल्याची बाब निदर्शनास आल्यास सरकारी कामकाजात अडथळा आणल्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा कर संकलन विभागाने गृहनिर्माण सोसायट्यांना दिला आहे.

अनेक फ्लॅॅटधारक वेळेत कर भरत नाहीत. त्यामुळे त्यांचे फ्लॅॅट जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील सहाशे सोसायट्यांना नोटीस दिल्या आहेत. लवकरच ही कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

- नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, कर संकलन विभाग.

Web Title: pcmc Pay property tax otherwise flat will be confiscated Tax Collection Department Notices 600 Societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.