PCMC: गुरुवार, शुक्रवारी कर भरण्याची सुविधा; कॅश काऊंटर सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार

By विश्वास मोरे | Published: May 29, 2024 08:20 PM2024-05-29T20:20:26+5:302024-05-29T20:22:56+5:30

पिंपरी - चिंचवड महापालिकेने सिद्धी उपक्रमांतर्गत महिला बचत गटामार्फत मालमत्ताधारकांना बिलांचे वेळेत वाटप केले आहे...

PCMC: Thursday, Friday tax payment facility; The cash counter will be open till 6 pm | PCMC: गुरुवार, शुक्रवारी कर भरण्याची सुविधा; कॅश काऊंटर सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार

PCMC: गुरुवार, शुक्रवारी कर भरण्याची सुविधा; कॅश काऊंटर सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार

पिंपरी : महापालिकेच्या विविध कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी मालमत्ताधारकांची कर संकलन कार्यालयात गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी गुरुवार (दि. ३०) आणि शुक्रवारी (दि. ३१) कर संकलन कार्यालयातील कॅश काउंटरची वेळ वाढविण्यात आली आहे. त्यामुळे मालमत्ताधारक सायंकाळी सहा वाजेपर्यंत कर भरू शकतील.

पिंपरी - चिंचवड महापालिकेने सिद्धी उपक्रमांतर्गत महिला बचत गटामार्फत मालमत्ताधारकांना बिलांचे वेळेत वाटप केले आहे. त्यामुळेच कर संकलन विभागाने आर्थिक वर्षातील पावणेदोन महिन्यातच अडीचशे कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कर भरण्यास अनेक मालमत्ताधारक प्राधान्य देत आहेत.

कर भरण्याची ऑनलाइन सुविधा

महापालिकेचे कर संकलनासाठी १७ झोन आहेत. तसेच ऑनलाइनही सुविधा उपलब्ध आहे. मात्र, अनेक नागरिक रोखीने कर भरत आहेत. त्यामुळे कर संकलन कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. याचाच विचार करून महापालिकेच्या वतीने गुरुवार आणि शुक्रवारी कॅश काउंटर सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.

Web Title: PCMC: Thursday, Friday tax payment facility; The cash counter will be open till 6 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.