PCMC: सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांची बदली रद्द
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: February 28, 2024 09:00 AM2024-02-28T09:00:33+5:302024-02-28T09:01:01+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत...
पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांची अहेरी, गडचिरोली येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली होती. मात्र, त्यांची बदली रद्द करण्यात आल्याचे आदेश राज्य शासनाने मंगळवारी काढले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून करण्यात आल्या आहेत. एका जिल्ह्यात सलग तीन वर्षे काम केल्यानंतर त्या जिल्ह्यातील दुसरीकडे बदली केली जाते. अधिकारी त्या जिल्ह्यातील असतील दुसऱ्या जिल्ह्यात बदली केली जाते. मात्र, जोशी यांचा कार्यकाल ही संपला नव्हता व तसेच त्यांचा पुणे जिल्हा नव्हता त्यामुळे त्यांची बदली रद्द करण्यात आली आहे.
उपजिल्हाधिकारी असलेले विठ्ठल जोशी यांची ४ एप्रिल २०२२ मध्ये प्रतिनियुक्तीने महापालिकेत उपायुक्तपदी नियुक्ती केली होती. क्रीडा, दक्षता व नियंत्रण, सामान्य प्रशासन विभागात चांगले काम केले. दोन वर्षानंतर त्यांची अहेरी, गडचिरोली येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे. मूळ महसूल विभाग नागपूर असल्याने निवडणूक पदावर गडचिरोली येथे झाल्याचे जोशी यांनी सांगितले