PCMC | अडीच मिनिटांच्या व्हिडीओसाठी अडीच लाखांचा खर्च; महापालिकेची उधळपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 02:06 PM2022-11-16T14:06:25+5:302022-11-16T14:07:50+5:30
अडीच मिनिटांच्या क्लिपसाठी केलेल्या या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे..
पिंपरी : महापालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले. जनजागृती करण्यासाठी पालिकेच्या वतीने २ मिनिटे २४ सेकंदांची व्हिडीओ क्लिप तयार करण्यात आली. या क्लिपसाठी महापालिकेने तब्बल अडीच कोटी रुपयांची उधळपट्टी केली आहे. अडीच मिनिटांच्या क्लिपसाठी केलेल्या या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
महापालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहरातील झोपडपट्ट्यांना रंगरंगोटी करण्यात आली. तसेच शहरातील कचरा विघटन, कचरा वर्गीकरण आदी उपक्रमांचा समावेश होता. या सर्व उपक्रमांची एकत्रित चित्रफीत तयार करून ती प्रसिद्ध करण्यात येणार होती. त्यासाठी मेसर्स स्वरा पब्लिसिटी यांनी २ मिनिटे २४ सेकंदाची व्हिडीओ क्लिप तयार करून दिली. त्यासाठी त्यांना तब्बल २ लाख ५० हजार रुपये दिले आहेत. अडीच मिनिटांच्या क्लिपसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.