वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू, देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 16:27 IST2021-06-12T16:26:23+5:302021-06-12T16:27:03+5:30
याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू, देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी : अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. तळवडे चौक येथे शुक्रवारी (दि. ११) हा अपघात झाला.
रियाजउद्दीन खलील सिद्दीकी (वय ३५), असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. शहाबुद्दीन खलील सिद्दीकी (वय ३८, रा. विठ्ठलवाडी, ता. हवेली) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ रियाजउद्दीन हा रस्त्याने पायी जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात रियाजउद्दीन गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.