भरधाव वाहनाच्या धडकेत पायी चालत जाणाऱ्या महिलेचा मृत्यू; चिंचवडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 12:49 PM2023-07-29T12:49:09+5:302023-07-29T12:50:01+5:30
ही घटना साडेअकरा वाजताच्या सुमारास आंबेडकर नगर चिंचवड येथे घडली...
पिंपरी : रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलेला भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने धडक दिली. त्यात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना २५ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास आंबेडकर नगर चिंचवड येथे घडली.
साहेबराव रावण बचुटे (वय ६५, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच १४/जेएम ९१३१ या वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण हॉटेलमध्ये काम करीत होत्या. २५ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता हॉटेलमधील काम संपवून त्या घरी पायी जात होत्या. त्यावेळी त्यांना भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने फिर्यादी यांच्या बहिणीचा मृत्यू झाला.