पुणे-नाशिक महामार्गावर वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 17:35 IST2022-06-13T17:30:05+5:302022-06-13T17:35:01+5:30
सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला...

पुणे-नाशिक महामार्गावर वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू
पिंपरी : रस्ता ओलांडत असलेल्या पादचाऱ्याला भरधाव वाहनाने धडक दिली. यात जखमी झाल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. पुणे-नाशिक महामार्गावर लांडगे नगर, भोसरी येथे २२ मे २०२२ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.
दिलीप किसनराव सोनकांबळे (वय ४५) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. त्यांचा मुलगा सिद्धार्थ दिलीप सोनकांबळे (वय २३, रा. गुळवेनगर, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. १२) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील दिलीप सोनकांबळे हे कामावरून घरी येत होते. त्यावेळी पायी रस्ता ओलांडताना आरोपीच्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात जखमी झाल्याने दिलीप सोनकांबळे यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर दिलीप सोनकांबळे यांना उपचारासाठी नेण्याची मदत न करता आरोपी वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला, असे फिर्यादीत नमूद आहे.