दोषी चालकांवर दंडआकारणी
By admin | Published: January 23, 2017 02:49 AM2017-01-23T02:49:32+5:302017-01-23T02:49:32+5:30
वाहतूक नियमांचा भंग करत बेदरकारपणे वाहन चालविणे, विनालायसन्स वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, विनाहेल्मेट
लोणावळा : वाहतूक नियमांचा भंग करत बेदरकारपणे वाहन चालविणे, विनालायसन्स वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, विनाहेल्मेट गाडी चालविणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे आदी प्रकारे नियमांचा भंग करणाऱ्यांवर आता शासन अधिसूचना क्रमांक एमव्हीआर ०७१६/प्रक.३४२/परि २ अंतर्गत तडजोड शुल्कात वाढ करण्यात आली आहे. १७ जानेवारी २०१७ पासून पुणे ग्रामीण वाहतूक विभागाकडून या नवीन अधिसूचनेनुसार दंड आकारणी सुरू करण्यात आली आहे.
नवीन नियमांनुसार विनाहेल्मेट वाहन चालविणे, अधिकाऱ्यांचे आदेश न मानणे, लायसन्स नसलेल्या व्यक्तीला वाहन चालविण्यास देणे, विनालायसन्स वाहन चालविणे याकरिता प्रत्येकी ५०० रुपये दंड, चुकीची नंबरप्लेट, गाडीला रिफ्लेक्टर व टेल लॅम्प नसणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, धोकादायकरीत्या वाहन चालविणे याकरिता १००० रुपये दंड, अपात्र असताना लायसन्स मिळविणे २०० रुपये व नियमभंग करत अतिवेगाने वाहन चालविण्यासाठी २००० रुपये दंडाची आकारणी करण्यात येणार आहे.(वार्ताहर)