प्रलंबित योजनांना मिळणार गती
By admin | Published: April 24, 2017 04:53 AM2017-04-24T04:53:49+5:302017-04-24T04:53:49+5:30
कोणत्याही राजकीय दबावास बळी न पडता डॉ. श्रीकर परदेशी यांनी बेशिस्त महापालिकेला सुतासारखे सरळ केले होते. त्यांच्यानंतर
पिंपरी : कोणत्याही राजकीय दबावास बळी न पडता डॉ. श्रीकर परदेशी यांनी बेशिस्त महापालिकेला सुतासारखे सरळ केले होते. त्यांच्यानंतर श्रवण हर्डीकर यांच्या रूपाने महापालिकेला डॅश्ािंग अधिकारी मिळणार आहे. त्यामुळे मेट्रो, स्मार्ट सिटी, गुड गव्हर्नन्स, अमृत, चोवीस तास पाणी अशा विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळणार असल्याचे बालेले जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी दिनेश वाघमारे यांची २७ एप्रिल २०१६ रोजी नियुक्ती झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास करून त्यांची पिंपरीसाठी नियुक्ती केली होती. त्यामुळे प्रभागरचनेपासून, तर नगरसेवकांचे राजीनामे घेण्यापर्यंत सरकारला पोषक असे काम केले होते. महापालिका निवडणुकीनंतर त्यांना पदोन्नती मिळाली आहे. तसेच कुटुंब मुंबईत आहे, म्हणून बदलीची मागणी त्यांनी सरकारकडे केली होती. दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमधील विकासकामांना गती मिळत नाही, आयुक्त वेळ देत नाहीत, म्हणून त्यांचा बदली व्हावी, यासाठी भाजपाचा एक गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे मागणी करीत होता. त्यामुळे महिनाभरात बदली होईल, असे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. शनिवारी सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. आयुक्तपदाची जबाबदारी हर्डीकर यांच्यावर सोपविली आहे. (प्रतिनिधी)