अकरा वर्षे लढ्यानंतर मिळाली पेन्शन, कागदपत्रांची जमवाजमव करण्यात दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 06:24 AM2017-12-23T06:24:42+5:302017-12-23T06:30:57+5:30
सेवानिवृत्तीनंतर तब्बल अकरा वर्षांचा संघर्ष केला, तेव्हा कुठे निवृत्तिवेतन पदरात पडले. तळवडे ग्रामपंचायत येथे सेवक पदावर सदाशिव भालेकर यांनी २२ वर्षे सेवा केली. १९९७ मध्ये तळवडेसह काही गावांचा महापालिकेमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे त्यांनाही महापालिकेत सामावून घेतले़ त्यानंतर २००६ मध्ये सदाशिव भालेकर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले़
तळवडे : सेवानिवृत्तीनंतर तब्बल अकरा वर्षांचा संघर्ष केला, तेव्हा कुठे निवृत्तिवेतन पदरात पडले. तळवडे ग्रामपंचायत येथे सेवक पदावर सदाशिव भालेकर यांनी २२ वर्षे सेवा केली. १९९७ मध्ये तळवडेसह काही गावांचा महापालिकेमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे त्यांनाही महापालिकेत सामावून घेतले़ त्यानंतर २००६ मध्ये सदाशिव भालेकर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले़ परंतु दहा वर्षे अर्हताकारी सेवा न झाल्यामुळे प्रशासनाच्या वतीने निवृत्तिवेतन नाकारण्यात आले. सतत अकरा वर्षे लढा दिल्यानंतर भालेकर यांच्या लढ्याला यश आले.
निवृत्तिवेतन मिळत नव्हते, शारीरिक मर्यादा आणि आर्थिककोंडी होत असल्याने सदाशिव भालेकर यांच्या आयुष्याची फरपट होत होती, दरम्यानच्या काळात दैवाने साथ दिली़ प्रशासकीय अडचणी सुटत गेल्या. या लढ्यात अनेकांनी मार्गदर्शन केले, मोलाचा सल्ला दिला यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन आयुक्त राजीव जाधव, सध्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर व नगरसेवक पंकज भालेकर यांनी मोलाचे सहकार्य केले़ आवश्यक कागदत्रांची जमवाजमव केली आणि त्यानंतर महाराष्ट्र शासन व पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मंजुरी देण्यात आली.