दुसऱ्यांदा मुलगी झाल्याने छळ ; विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 16:55 IST2021-03-20T16:54:43+5:302021-03-20T16:55:19+5:30
हिंजवडीत गुन्हा दाखल; पतीला अटक

दुसऱ्यांदा मुलगी झाल्याने छळ ; विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
पिंपरी : दोन्ही मुली असल्याच्या कारणावरून तसेच, चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली. यात विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे.
योगेंद्र मिनबहाद्दुर साही (वय २४, रा. नारायणनगर, हिंजवडी, मूळ रा. नेपाल), असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी मयत विवाहितेच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. १९) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची २१ वर्षीय मुलगी तिच्या लग्नानंतर पतीसोबत राहत होती. तिला दोन्ही मुली झाल्याच्या कारणावरून तसेच, तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा पती तिला शिवीगाळ व मारहाण करीत असे. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. विवाहितेने १८ मार्च २०२१ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची फिर्याद तिच्या आईने दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पती साही याला अटक केली.