वाहिनीतून पेट्रोलची चोरी

By admin | Published: March 19, 2017 03:58 AM2017-03-19T03:58:53+5:302017-03-19T03:58:53+5:30

हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशनच्या मुंबई ते सोलापुर डिझेल-पेट्रोल वाहिनीस छिद्र पाडून अज्ञात चोरट्याने साडेसहा लाख रुपये किंमतीच्या दहा हजार लिटर डिझेल व पेट्रोलची चोरी

Petrol stolen from the channel | वाहिनीतून पेट्रोलची चोरी

वाहिनीतून पेट्रोलची चोरी

Next

देहूरोड : हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशनच्या मुंबई ते सोलापुर डिझेल-पेट्रोल वाहिनीस छिद्र पाडून अज्ञात चोरट्याने साडेसहा लाख रुपये किंमतीच्या दहा हजार लिटर डिझेल व पेट्रोलची चोरी केल्याची घटना उघडकीस आली. हा प्रकार तळवडे गावाजवळ घडला.
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉपोर्रेशनच्या वतीने पीयूष उमेश्चंद्र वर्मा ( वय ४६ . रा मगरपट्टा , हडपसर, पुणे) यांनी याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशनची मुंबई ते सोलापूर अशी भूमिगत चौदा इंची वाहिनी अंदाजे चार फूट असून त्यातून पेट्रोल, डिझेल व केरोसिनची वाहतूक होते. या इंधनाची चोरी होत असल्याचे कॉपोर्रेशनच्या निदर्शनास आल्यानंतर व्यवस्थापनाने रात्र गस्तीसाठी पथक नियुक्त केले होते.
तळेगाव नियंत्रण कक्षामध्ये वाहिनीतून गळती किंवा चोरी बाबत संबंधित यंत्रणेवर इंडिकेटरद्वारे समजते.
तसेच पीआय डिएस यंत्रणेत संबंधित वाहिनीवर कोणी छिद्र (खड्डा) घेत असल्याचे इंडिकेटर दिसून आले. त्यानंतर दहा मार्चला पंपिंग चालू असताना तळेगाव येथून पास होणारे इंधन लोणी येथे पोहोचत नसल्याचा फरक लक्षात आला. यासह गळतीचा अलार्मही वाजला.(वार्ताहर)

अशी आली चोरी उघडकीस
१४ मार्चला कंपनीच्या हैद्राबाद विभागाने लाईनवर कि मी क्रमांक नं १२६.६ ते १३० किमी दरम्यान लिकेज किंवा चोरीचा पॉइंट असल्याची माहिती दिली. १७ मार्चला कॉपोर्रेशनचे अधिकारी हिमांशू जंतबल यांच्या पथकाने तळवडे गावच्या हद्दीत जेसीबीने खोदाई केली असता मुख्य पाईपवर दुसरा एक छोटा एल आकाराचा लोखंडी पाईप जोडल्याचे आढळून आले.

Web Title: Petrol stolen from the channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.