पाच लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ; उपाशीपोटी ठेवून केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 11:33 AM2021-06-01T11:33:29+5:302021-06-01T11:33:37+5:30

पती आणि सासू - सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Physical and mental abuse of a married woman for a dowry of five lakhs; Beaten by starvation | पाच लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ; उपाशीपोटी ठेवून केली मारहाण

पाच लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ; उपाशीपोटी ठेवून केली मारहाण

Next
ठळक मुद्देवैवाहिक जीवन चांगल्या प्रकारे जगू न दिल्याचे महिलेने तक्रारीत सांगितले.

पिंपरी: पाच लाख रुपये हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्यानंतर तिला उपाशीपोटी ठेवून मारहाणही केली. हिमाचल प्रदेश, विशाखापट्टणम व संत तुकाराम नगर, पिंपरी येथे ८ मार्च २०१८ ते २५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ही घटना घडली. 

महिलेने या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचा पती अनिष होसियारसिंग चौहाण (वय ३१), सासरे होसियारसिंग चौहाण (वय ६०), सासु बसलानदेवी होसियारसिंग चौहाण (वय ५५, रा. विशाखापट्टणम) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी महिलेला पाच लाख रुपये हुंड्यासाठी घालून पाडून बोलून हाताने मारहाण केली. तसेच उपाशीपोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला. तिला वैवाहिक जीवन चांगल्या प्रकारे जगू दिले नाही, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी तपास करीत आहेत.

Web Title: Physical and mental abuse of a married woman for a dowry of five lakhs; Beaten by starvation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.