चुकारांना घरी पाठविणार - महापौरांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 06:43 AM2017-10-04T06:43:50+5:302017-10-04T06:44:02+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाºयांनी मंगळवारी नाराजी व्यक्त केली. सत्ता येऊन सहा महिने झाले. मात्र, अधिकारी कामे करीत नसल्याने
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाºयांनी मंगळवारी नाराजी व्यक्त केली. सत्ता येऊन सहा महिने झाले. मात्र, अधिकारी कामे करीत नसल्याने सत्ताधा-यांनी नाराजी व्यक्त केली. ‘ही लास्ट वॉर्निंग आहे. कामे करायचे असेल तर करा, नाहीतर कार्यमुक्त व्हा. कामचुकार अधिकाºयांना पाठीशी घालणार नाही. कडक कारवाई केली जाईल, असा निर्वाणीचा इशारा महापौर नितीन काळजे आणि पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिला. पाण्याची कृत्रिम टंचाई, गंभीर झालेली कचरा समस्या याबाबत सत्ताधाºयांनी नाराजी व्यक्त केली.
मागील आठवड्यात भाजपाच्या वतीने झालेल्या बैठकीत पालकमंत्री गिरीश बापट आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नेत्यांची कानउघाडणी केली होती. ‘माझ्यामुळे सत्ता आली असे कोणी म्हणत असेल, तर ही बाब चुकीची आहे. सत्ता भाजपामुळे आली आहे’, असा चिमटाही काढला होता. त्यानंतर आज महापालिकेत महापौर नितीन काळजे, सभागृहनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, उपमहापौर शैलजा मोरे यांनी अधिकाºयांसमवेत बैठक घेतली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह विभागप्रमुख अधिकारी झाडून उपस्थित होते. सुमारे चार तास बैठक सुरू होती. कार्यप्रणाली सुधारण्यासाठी अधिकाºयांना १५ दिवसांची मुदत दिली आहे.
पक्षनेते पवार म्हणाले, ‘‘सहा महिने अधिकाºयांना संधी दिली. महापालिकेत सत्तांतर झाल्याची मानसिकता अद्यापही अधिकाºयांची झालेली नाही. टिपिकल पद्धतीने काम सुरू आहे. हे संथगती कामकाज योग्य नाही. शहरात पाण्याची कृत्रिम टंचाई आहे. कचºयाचे साम्राज्य आहे. संपूर्ण शहराला विनापरवाना फलकांचा विळखा पडला आहे. या समस्या लवकर सोडविण्याबाबत अधिकाºयांना कडक सूचना दिल्या आहेत. नागरिकांना दर्जेदार सेवा पुरविली पाहिजे. कामात तत्परता दाखवावी. यापुढे पाट्या टाकणाºया अधिकाºयांची गय करणार नाही. कामात दिरंगाई केल्यास घरचा रस्ता दाखविण्यात येईल. ’’