धक्कादायक! दुचाकी चालवताना फोन उचलणे बेतले तरुणाच्या जिवावर

By नारायण बडगुजर | Published: April 6, 2023 07:35 PM2023-04-06T19:35:12+5:302023-04-06T19:36:12+5:30

किरण नामदेव पांचाळ (वय ४०, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.

Picking up the phone while riding a bike cost the life of a young man | धक्कादायक! दुचाकी चालवताना फोन उचलणे बेतले तरुणाच्या जिवावर

धक्कादायक! दुचाकी चालवताना फोन उचलणे बेतले तरुणाच्या जिवावर

googlenewsNext

पिंपरी : दुचाकी चालवत असताना मोबाइल फोनवर काॅल आला. त्यामुळे खिशातून फोन काढताना तोल जाऊन दुचाकी पडली. यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराच्या जीवावर बेतले. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धावडे वस्ती, भोसरी येथे २२ मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला होता. 

किरण नामदेव पांचाळ (वय ४०, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी दत्तात्रय शंकरराव पोतदार (वय ४५, रा. चऱ्होली फाटा, आळंदी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोतदार आणि त्यांचा मावस भाऊ किरण पांचाळ हे २२ मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास दुचाकीवरून चक्रपाणी वसाहत भोसरी येथे जात होते. धावडे वस्ती भोसरी येथे आल्यानंतर किरण यांना कोणाचा तरी फोन आला. त्यामुळे त्यांनी शर्टच्या वरच्या खिशातून मोबाईल काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. तोल जाऊन दुचाकी पडून अपघात झाला. या अपघातात किरण हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार तपास करीत आहेत.

Web Title: Picking up the phone while riding a bike cost the life of a young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.