पिंपरीत कामगारांच्या पगारावर चोरट्यांचा डल्ला, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:24 PM2017-11-11T23:24:51+5:302017-11-11T23:24:56+5:30
कामगारांचा पगार करण्यासाठी कंपनीच्या कार्यालयातील ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या २ लाख १६ हजार रुपयांवर दोन कामगारांनी डल्ला मारला. हा प्रकार एमआयडीसीतील अलका टेक्नोलॉजी कंपनीत शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास घडला.
पिंपरी : कामगारांचा पगार करण्यासाठी कंपनीच्या कार्यालयातील ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या २ लाख १६ हजार रुपयांवर दोन कामगारांनी डल्ला मारला. हा प्रकार एमआयडीसीतील अलका टेक्नोलॉजी कंपनीत शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास घडला. याप्रकरणी सदाशिव कोल्हे (वय ३७, रा. चिंचवडगाव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसीमध्ये एस. ब्लॉकमध्ये अलका टेक्नोलॉजी ही कंपनी आहे. या कंपनीतील कामगारांचा पगार करण्यासाठी फिर्यादी कोल्हे यांनी बँकेतून दोन लाख १६ हजार रुपये काढले होते. ही रक्कम त्यांनी कार्यालयाच्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती. अनिल वालचंद्र यादव, संतोष यादव (दोघे ही रा. निरोर, बिहार) हे याच कंपनीत कामाला आहेत. कामगारांच्या पगाराची रक्कम चोरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, त्यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गुरुवारी सव्वाचार ते शुक्रवारी रात्री दहा-अकराच्या सुमारास ड्रॉवरचे कुलूप तोडून रोकड घेऊन पसार झाले.