पिंपळे गुरव पोलीस चौकी : समस्यांची तक्रार नोंदवायची कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:23 AM2018-08-14T01:23:33+5:302018-08-14T01:24:10+5:30
परिसरातील हजारो नागरिकांची सुव्यवस्था ठेवणारी पिंपळे गुरव पोलीस चौकी आहे. ही चौकी अपुऱ्या जागेत आहे. स्वच्छतागृह, वाहन र्पाकिंगचा अभाव, कचरा, पिण्याचे पाणी आदी समस्यांनी पिंपळे गुरव पोलीस चौकीला विळखा घातला आहे.
पिंपळे गुरव - परिसरातील हजारो नागरिकांची सुव्यवस्था ठेवणारी पिंपळे गुरव पोलीस चौकी आहे. ही चौकी अपुऱ्या जागेत आहे. स्वच्छतागृह, वाहन र्पाकिंगचा अभाव, कचरा, पिण्याचे पाणी आदी समस्यांनी पिंपळे गुरव पोलीस चौकीला विळखा घातला आहे.
सांगवी पोलीस ठाण्यांतर्गत पिंपळे गुरव पोलीस चौकीचे कामकाज चालते. पिंपळे गुरव गावठाण, सुदर्शननगर, नवी सांगवी भागातील सुव्यवस्था जिजामाता उद्यानातील दोन अपु-या खोल्यांमध्ये अपुºया जागेत सुरू आहे. तीन सहायक पोलीस निरीक्षक, तीन लेखनिक, दोन हवालदार, दोन बीट मार्शल असे दहा कर्मचारी कार्यरत आहेत.
पार्किंगची सोय नसल्याने नागरिक चौकीत आल्यानंतर त्यांना आपली वाहने भर रस्त्यावर किंवा पदपथावर उभी करावी लागतात. त्यासाठी प्रशस्त जागेची गरज आहे. पुरुष व महिला तक्रारी देण्यासाठी आल्यानंतर स्वच्छतागृहाचा अभाव असल्यामुळे कुचंबणा होत आहे.
गैरसोय : अपुºया जागेमुळे नागरिकांना त्रास
सांगवी पोलीस ठाण्यांतर्गत या चौकीचे काम चालते. सांगवी पोलीस ठाणेच भाड्याच्या जागेत आहे. पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांना आणि तेथे येणाºया नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तशीच अवस्था पिंपळे गुरव पोलीस चौकीची आहे. या ठिकाणी स्वच्छतागृहाचा अभाव असल्याने नागरिकांची आणि कर्मचाºयांची कुचंबणा होत आहे. अपुºया जागेमध्ये पोलिसांना काम करावे लागते. या ठिकाणी असणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. परंतु, अद्याप याबाबत तोडगा निघालेला नाही.
पोलीस ठाण्याच्या आवारातच जप्त केलेली वाहने उभी केली जातात. त्यामुळे या ठिकाणी आधीच अपुरी असलेली जागा कमी पडते. या चौकीसाठी नवीन आयुक्तालय झाल्यानंतर तरी जागा मिळेल का, असा प्रश्न विचारला जात आहे.
पोलीस चौकीसाठी जागा अपुरी आहे. कायमस्वरुपी जागा मिळवण्यासाठी प्राधान्य देणार आहे. चौकीचा परिसर स्वच्छ ठेवणार आहे. काही दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला आहे. नागरिकांना आवश्यक सोयी उपलब्ध करून देणार आहे. नवीन आयुक्तालयामुळे समस्या सोडविणे सोईस्कर होईल.
- संजय निकुंभ, सहायक पोलीस निरीक्षक, पिंपळे गुरव पोलीस चौकी
नागरिकांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने ताटकळत उभे राहावे लागते. नागरिकांना वाहने उभी करण्यासाठी र्पाकिंग आवश्यक आहे. कचरा उचलून परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. पिण्याच्या पाण्याची सोय करावी. पोलीस चौकीसाठी महापालिकेने कायमस्वरुपी जागा उपलब्ध करुन द्यावी.
- किसन फसके, पिंपळे गुरव