धक्कादायक...! सेवानिवृत्त सुभेदाराकडून अल्पवयीन मुलावर अत्याचार;बाेपखेल येथील खळबळजनक घटना

By नारायण बडगुजर | Updated: April 15, 2025 14:11 IST2025-04-15T14:11:21+5:302025-04-15T14:11:45+5:30

सेवानिवृत्त सुभेदाराला स्थानिकांनी मारहाण करून दिले पोलिसांच्या ताब्यात

pimpari-chinchwad crime news Retired Subedar tortures minor boy; Sensational incident in Boepkhel | धक्कादायक...! सेवानिवृत्त सुभेदाराकडून अल्पवयीन मुलावर अत्याचार;बाेपखेल येथील खळबळजनक घटना

धक्कादायक...! सेवानिवृत्त सुभेदाराकडून अल्पवयीन मुलावर अत्याचार;बाेपखेल येथील खळबळजनक घटना

पिंपरी : सैन्य दलातील सेवानिवृत्त सुभेदाराने १३ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी स्थानिकांनी त्याला पकडून मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. बोपखेले येथे रविवारी (दि. १३ एप्रिल) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. 

लाला मोहम्मद शेख (६५, रा. रामनगर, बोपखेल) असे गुन्हा दाखल झालेल्या सेवानिवृत्त सुभेदाराचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने याप्रकरणी सोमवारी (दि. १४ एप्रिल) दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा सैन्य दलातील सेवानिवृत्त सुभेदार असून तो बोपखेले येथे भाडेतत्वावर राहण्यास आहे. त्याची पत्नी आणि मुले दुसऱ्या ठिकाणी राहतात. 

दरम्यान, शेख हा त्याच्या खोलीत पीडीत १३ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करत होता. याबाबत स्थानिक नागरिकांना माहिती मिळाली. त्यांनी शेख याला पकडून मारहाण केली. तसेच त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मारहाणीत जखमी झाल्याने शेख याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलिसांनी शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

Web Title: pimpari-chinchwad crime news Retired Subedar tortures minor boy; Sensational incident in Boepkhel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.