Pimpari: पिंपरी ते निगडी मेट्रोचा पहिला खांब बांधण्याचे काम सुरू

By विश्वास मोरे | Published: July 6, 2024 08:12 PM2024-07-06T20:12:14+5:302024-07-06T20:12:31+5:30

Pimpari News:पिंपरी ते निगडी मेट्रोचा पहिला खांब बांधण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे. अण्णाभाऊ साठे पीएमपीएमल बस आगार, निगडी येथे या कामाला भक्ती-शक्तीजवळ सुरुवात झाली. भू-तपासण्यांनंतर हा महत्त्वपूर्ण या कामाला सुरुवात केली आहे.

Pimpari: Construction of first pillar of Pimpari to Nigdi Metro started | Pimpari: पिंपरी ते निगडी मेट्रोचा पहिला खांब बांधण्याचे काम सुरू

Pimpari: पिंपरी ते निगडी मेट्रोचा पहिला खांब बांधण्याचे काम सुरू

- विश्वास मोरे
पिंपरी  - पिंपरी ते निगडी मेट्रोचा पहिला खांब बांधण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे. अण्णाभाऊ साठे पीएमपीएमल बस आगार, निगडी येथे या कामाला भक्ती-शक्तीजवळ सुरुवात झाली. भू-तपासण्यांनंतर हा महत्त्वपूर्ण या कामाला सुरुवात केली आहे. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पीसीएमसीचे आयुक्त शेखर सिंग, संचालक अतुल गाडगीळ, संचालक  विनोद अग्रवाल, कार्यकारी संचालक प्रशासन आणि जनसंपर्क डॉ. हेमंत सोनवणे, किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक  उपस्थित होते.

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या उत्तर-दक्षिण मार्गिकेवरील पिंपरी चिंचवड ते निगडी (भक्ती शक्ती चौक) या ४.५१९ किमी लांबीच्या उन्नत मार्गिकेच्या व्हायाडक्टचे काम दिनांक १५ मार्च २०२४ ला  रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला दिले आहे. हा प्रकल्प १३० आठवड्यांत पूर्ण होणार आहे आणि त्यात चार स्थानके असतील: चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्ती-शक्ती. या मार्गाच्या व्हायडक्त बांधकामासाठी १५१ स्पॅन आणि ११८१ सेगमेंट ची आवश्यकता लागणार आहे.  तळेगाव जवळ सेगमेंट व गर्डर बनावीन्याला सुरुवात केली आहे.
 
धार्मिक स्थळांना जोडणार 
विस्तार मार्ग पिंपरी चिंचवड क्षेत्रातील प्रमुख भागांना जोडेल.  चिंचवड स्थानक व्यावसायिक, निवासी, औद्योगिक आणि धार्मिक स्थळे आणि चिंचवड भारतीय रेल्वे स्थानकाशी जोडण्यात येईल. आकुर्डी स्थानक निवासी, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रांची पूर्तता करेल; निगडी आणि भक्ती-शक्ती स्थानके निवासी, मनोरंजन आणि धार्मिक स्थळे जोडलीत आणि देहू, चिखली, तळेगाव आणि वडगाव यांसारख्या निमशहरी भागांना जोडणाऱ्या शहर बस आगारांशी जोडण्यात येतील. 
... 
पीसीएमसी आणि पुणे या शहरांच्या दरम्यान लोकांची लक्षणीय प्रवासी हालचाल होत आहे आणि या नवीन मेट्रो विभागामुळे देहू, चिखली, तळेगाव आणि वडगाव यांसारख्या उपनगरी भागातील अनेकांना तसेच पीसीएमसी, निगडी आणि आकुर्डी येथील रहिवाशांना सुधारित कनेक्टिव्हिटी मिळाल्याने फायदा होणार आहे. पुण्याच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि मध्य भागात बसेस, रिक्षा, ई-रिक्षा, सायकली आणि ई-बाईकसह फीडर सेवा या मेट्रो स्थानकांसोबत जोडल्याने प्रवाशांना याचा मोठ्याप्रमाणावर फायदा होणार आहे.

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्री.शेखर सिंह म्हणाले, “पीसीएमसी ते निगडी या विस्तारित मार्गाच्या कामाची आज सुरुवात होत आहे. या मार्गामुळे या विभागातील मोठ्याप्रमाणात असणारा रहिवासी भाग, कारखाने, शाळा, कॉलेज मेट्रोने जोडले जाणार आहेत. या मार्गाच्या कामासाठी पीसीएमसी तर्फे सर्वोतपरी मदत करण्यात येईल.”

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर म्हणाले, “पीसीएमसी ते निगडी या विस्तारीत मार्गामुळे या परिसरातील रवासी भाग मेट्रोद्वारे जोडले जाणार आहेत. नियोजित १३० आठवड्याच्या वेळात हे काम पूर्ण करण्यासाठी मेट्रोने नियोजन केले आहे. आणि त्या अनुषंगाने वेगाने काम सुरु केले आहे.”

Web Title: Pimpari: Construction of first pillar of Pimpari to Nigdi Metro started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.